गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आयुक्तांचा दणका, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सुनावली शिक्षा

वानवडी परिसरात डिसेंबर 2020 मध्ये बेटींगप्रकरणी छापा टाकण्यात आला होता. त्यानुसार पाच जणांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यातील आरोपी मनीष अजवानी याच्या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढला असता, वानवडीचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील हे छापा टाकण्यापूर्वी आरोपीसोबत बोललेल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे 13 वेळा फोनवर बोलणे झाल्याचे सीआडीआरमध्ये दिसून आले. त्यामुळे पाटील यांनी केलेले वर्तन बेजबाबदार पणाचे आहे. पोलिस दलाच्या शिस्तीस बाधा आणणाने कृत्य केल्याचा ठपका ठेवत पाटील यांची एक वर्षे पगारवाढ रोखण्याची शिक्षा देण्यात आली आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी 2021 मध्ये जुगार अड्डयावर छापा टाकून कारवाई केली. त्याठिकाणी जुगार खेळताना 62 जणांना पकडण्यात आले होते. त्यावेळी लष्कर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश सोनवणे हे त्याठिकाणी गेले. त्यांनी पोलिस ठाण्याची संयुक्त कारवाई दाखवा अथवा जास्त मोठी कारवाई करू नका, असे बोलू लागले. त्यामुळे संबंधित जुगार अड्ड्याची माहिती सोनवणे यांना होती, अशी गोपणीय माहिती वरिष्ठांना मिळाली होती. पण, त्यांनी जाणीवपूर्वक कारवाई केली नाही. लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोजपणे जुगार खेळला जात होता. हद्दीतील अवैधधंद्याचे उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्या असताना देखील वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनाही एक वर्षे पगार वाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे.

नगर जिल्ह्यातील शेगाव पोलिस ठाण्यात नेमणुकीला असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्याचा तपास व दोषारोपपत्र दाखल करताना निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळे त्यांना देखील पोलिस आयुक्तींनी चौकशी करून सक्त ताकीदची शिक्षा सुनावली आहे. पोलिस आयुक्तांनी थेट वरिष्ठ निरीक्षकांना शिक्षा सुनावल्यामुळे दलात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *