गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मायलेकराची निर्घृण हत्या; कात्रजमध्ये चिमुकल्याचा तर सासवडमध्ये आईचा आढळला मृतदेह

पुणे, 16 जून: पुण्यात मायलेकराची हत्या करून त्यांचा मृत दोन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच दिवशी मायलेकराचा खून झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. दोन्ही मृतदेहांची ओळख पटली असून महिलेच्या पतीचा शोध घेतला जात आहे. हत्या झालेल्या दिवसापासून मृत महिलेचा पती गायब आहे. संबंधित मायलेकराची हत्या नेमकी कोणी केली अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत.

मंगळवारी सायंकाळी नवीन कात्रज बोगद्याजवळ एका सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळला होता. मुलाची गळा आवळून हत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं.

यानंतर काही तासांतच सासवड याठिकाणी आईचा देखील मृतदेह आढळला आहे. आईच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली आहे. आयान शेख (वय-6) आणि आलिया आबिद शेख (वय-35) असं हत्या झालेल्या मायलेकरांची नावं आहेत. यांची हत्या नेमकी कोणी केली आणि कोणत्या कारणासाठी झाली, याची अद्याप पुष्टी झाली नाही.

मंगळवारी नवीन कात्रजच्या बोगद्याजवळ सहा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याची गळा आवळून हत्या केल्याची निष्पन्न झालं होतं. दरम्यान मुलाचे नातेवाईक मुलाचा शोध घेत असल्यानं मुलाची त्वरित ओळख पटली. त्यानंतर काही तासांतच पुरंदर तालुक्यातील खळद याठिकाणी आईचाही मृतदेह सापडला आहे. याचा तपास सासवड पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आलिया यांचे पती आबिद शेख पुण्यातील एका कंपनीत ब्रॅंच मॅनेजर म्हणून काम करतात. तीन दिवसांपूर्वी ते झूम कार घेऊन सहलीसाठी गेल्याची माहिती पोलिसांना आहे. पण अद्याप त्यांचाही काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे घातपात झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *