ताज्याघडामोडी

पुढील 5 दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

मागील तीन-चार दिवसांत पावसाने राज्यातील विविध भागात दमदार हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट आज आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा […]

ताज्याघडामोडी

रेशन दुकानातून वितरित होणार तांदूळ निकृष्ट असल्याच्या तक्रारी नाहीत

अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यात उत्कृष्ट दर्जा असलेल्या तांदळाचे वितरण केले जात आहे.राज्यात निकॄष्ट दर्जाचा, भेसळयुक्त तसेच खडे अथवा कचरा मिश्रीत असलेला तांदूळ वाटप झाल्याच्या कोणत्याही तक्रारी या विभागाला मिळालेल्या नाहीत, अशी माहिती अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत  प्रसिद्धीस देण्यात आली आहे. विकेंद्रित धान खरेदी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

”मी ईडीच्या कार्यालयातून बोलतोय”

यापूर्वीही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका पदाधिकार्‍याला ईडीच्या नावाने कॉल आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यावेळी तपासात काहीही निष्पन्न झाले नव्हते. हा प्रकार तसाच असल्याची शंका व्यक्त होत असली तरी याविषयी शहानिशा होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी (दि.१३) मोबाईलवर कॉल आला. मी ‘ईडी ‘ कार्यालयातून बोलतो आहे. आपल्याबाबत आमच्याकडे तक्रार आली आहे. त्यासंदर्भात […]

ताज्याघडामोडी

नामसंकीर्तन सभागृहाचे बांधकामासाठी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे लवकरच निधी उपलब्ध करणार- आ.प्रशांत परिचारक

पंढरपूर शहरात बांधणेत येत असलेल्या नामसंकीर्तन सभागृहाचे बांधकामास दुसऱ्या टप्यातील रू.१० कोटी निधी मिळावा यासाठी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांचे दालनामध्ये झालेल्या बैठकीत लवकरच निधी मंजूर करून वितरीत करणेबाबत त्यांनी आश्वासित केल्याची माहिती आ.प्रशांत परिचारक यांनी दिली. पंढरपूर शहरातील आदर्श शाळेलगतच्या नगरपालिकेच्या आरक्षण क्र.५३ येथील […]

ताज्याघडामोडी

आ.समाधान आवताडे बांधणार मुस्लिम समाज छोटा कब्रस्थानमध्ये दोन रूम

पंढरपूर शहरातील मुस्लिम समाजाची अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. त्यामध्ये सांगोला रोड वरील छोटा कब्रस्थानमध्ये दफणविधीचे सामान ठेवण्यासाठी दोन रूम बांधण्याच्या मागणीसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांना शहीद टिपू सुलतान युवक संघटना व मुस्लिम समाजातील बांधवांकडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. त्यास यश आले असून लवकरच त्या ठिकाणी आमदार निधीतून दोन रूम बांधून देण्यात […]

ताज्याघडामोडी

जिल्हाधिकार्‍यांकडे ठेकेदारांचे ठेके रद्द करण्याची मागणी- जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे

जिल्हाधिकार्‍यांकडे ठेकेदारांचे ठेके रद्द करण्याची मागणी- जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे । पंढरपूर, प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील 21 शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगारांचे पगार गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराने न दिल्याने त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. अशातच काही शासकीय धान्य गोदामातील ठेके एका-एका संस्थेकडे जास्त असल्याने ठेकेदारांना सर्वांचे पगार वेळेत करणे शक्य नाही. शासकीय धान्य गोदामातल कामगार […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यात मुळशी पॅटर्नचा थरार, लहान मुलासमोर तरुणावर धारदार कोयत्याने सपासप वार

पिंपरी-चिंचवडच्या चिखली भागात भर दिवसा धारधार शस्त्राने वार करत एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडली त्यावेळी एक लहान मुलगाही तेथे होता. गेल्या अनेक दिवसात पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुन्हा एकदा भररस्त्यात एका तरुणाची पूर्ववैमन्यस्यातून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ही घटना घडली असून […]

ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा आदेश

मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (सोमवार) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्सची स्थापन करावी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे असे निर्देश दिले. कोरोनाकाळात देखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये, या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोरोना काळात उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार […]

ताज्याघडामोडी

पटोलेंचा खळबळजनक आरोप; माझ्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाळत ठेवत आहे

काँग्रेसचे नेते नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून फोन टॅपिंग प्रकरणावरुन चर्चेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे. ते आज लोणावळ्यातील काँग्रेसच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. […]

ताज्याघडामोडी

SBI अलर्ट! आपला संपूर्ण डेटा चोरीला जातोय, मग चुकूनही हे मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका

 देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा ग्राहकांना सावध केलेय. स्टेट बँक ऑफ इंडियाने  आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये लोकांना बनावट मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आलाय. यासह बँकेने काही सेफ्टी टिप्स पाळण्याचा सल्लाही दिलाय. आपली सुरक्षा ही आमची प्राथमिकता एसबीआयने  ट्विट केले […]