ताज्याघडामोडी

SBI अलर्ट! आपला संपूर्ण डेटा चोरीला जातोय, मग चुकूनही हे मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका

 देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा ग्राहकांना सावध केलेय. स्टेट बँक ऑफ इंडियाने  आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये लोकांना बनावट मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आलाय. यासह बँकेने काही सेफ्टी टिप्स पाळण्याचा सल्लाही दिलाय.

आपली सुरक्षा ही आमची प्राथमिकता

एसबीआयने  ट्विट केले आहे की, अशा ठिकाणी संपूर्णपणे सत्यापित नसलेले अ‍ॅप डाऊनलोड करू नका.

‘आपली सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे! येथे काही सुरक्षा टिप्स आहेत, ज्या आपल्याला वैयक्तिक आणि आर्थिक डेटा चोरीपासून वाचवू शकतात. आजकाल वाढत्या फसवणुकीचा विचार करता बँकेने आपल्या ग्राहकांना अधिक सावधगिरीचा सल्ला दिलाय.’

बनावट अ‍ॅप्स टाळण्यासाठी बँकेने दिला सल्ला

कोरोना साथीच्या काळात फसवणुकीचे प्रकार सतत वाढत आहेत. अशा परिस्थितीत बनावट अ‍ॅप्सच्या माध्यमातून लोक सहज फसत आहेत. अशा परिस्थितीत बरेच लोक ठगांच्या जाळ्यात अडकलेत. यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. हेच कारण आहे की, एसबीआय वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी सतर्क सूचना जारी करते. बनावट अ‍ॅप्स व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या ईमेल, एसएमएस, कॉल किंवा एम्बेड केलेल्या लिंकपासून लोकांनी स्वत: ला दूर ठेवावे, असा सल्ला बँकेने दिलाय.

ग्राहकांना आमिषानं फसवणुकीचे बळी केले जातेय

गेल्या आठवड्यात एका सायबर सुरक्षा संशोधकाने असा इशारा दिला होता की, फिशिंग घोटाळ्यांतर्गत चिनी मूळचे हॅकर्स एसबीआय वापरकर्त्यांना लक्ष्य करीत आहेत. तो वेबसाईटची लिंक वापरून ग्राहकांना त्यांचे केवायसी अद्ययावत करण्यास सांगत आहेत. यानंतर व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या माध्यमातून ते 50 लाखांचे बक्षिसे जिंकण्याचे आमिष देत आहेत. आयएएनएसच्या अहवालानुसार, अशी दोन प्रकरणे समोर आली आहेत. या फसवणुकीशी संबंधित सर्व डोमेन चीनमधील नोंदी दाखवत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *