ताज्याघडामोडी

नामसंकीर्तन सभागृहाचे बांधकामासाठी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे लवकरच निधी उपलब्ध करणार- आ.प्रशांत परिचारक

पंढरपूर शहरात बांधणेत येत असलेल्या नामसंकीर्तन सभागृहाचे बांधकामास दुसऱ्या टप्यातील रू.१० कोटी निधी मिळावा यासाठी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांचे दालनामध्ये झालेल्या बैठकीत लवकरच निधी मंजूर करून वितरीत करणेबाबत त्यांनी आश्वासित केल्याची माहिती आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.
पंढरपूर शहरातील आदर्श शाळेलगतच्या नगरपालिकेच्या आरक्षण क्र.५३ येथील प्रशस्त जागेत नामसंकीर्तन सभागृह उभारण्यात येत आहे. सध्या शहरात एकही सुसज्ज नाट्यगृह नसल्यामुळे नामसंकीर्तन सभागृहाची निर्मिती सुरू आहे. सदर सभागृहामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जवळपास १२०० क्षमतेची आसन व्यवस्था, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, दर्शनी भागामध्ये पांडुरंगाची आकर्षक मूर्ती, संतांच्या मूर्ती आणि पालखी मार्गावरील महत्त्वाचे टप्पे याबाबतचे चित्र रेखाटण्यात येणार आहेत.
पंढरपूर येथे भाविक भक्त मोठय़ा श्रद्धेने येतात. या भाविकांसाठी एक सभागृह उभे करण्याची संकल्पना तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेपुढे आ.प्रशांत परिचारक यांनी मांडली. यासाठी सन २०१६ मध्ये पालिकेने जागा उपलब्ध करून दिली होती. सदर सभागृहाच्या पहिल्या टप्यातील कामास अभियांत्रिकी विद्यालय, पुणे यांचेकडून तांत्रिक मंजुरी व जिल्हा प्रशासनाकडून प्रशासकीय मंजुरी मिळाले नंतर नगरपालिका वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विषेश अनुदान योजनेअंतर्गत मार्च २०१७ मध्ये तत्काळ रू.१० कोटी निधी मिळून कामकाजही सुरु होऊन सध्या सुमारे 60% कामकाजही पूर्णत्वास आले आहे. तद्नंतर सदर कामासाठी आजतागायत निधी उपलब्ध होत नसल्याने कंत्राटदार व नगरपालिकेच्या सहकार्याने सदर कामकाज सुरु होते.  
आता आ.प्रशांत परिचारक यांनी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करून दुसऱ्या टप्यातील रू.१० कोटी मंजूर झाल्यास सदर कामास गती मिळेल अशी अशा व्यक्त केली होती. निधी उपलब्ध करून देण्यास नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आश्वासित केल्याने सदर कामास लवकरच गती मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *