ताज्याघडामोडी

आ.समाधान आवताडे बांधणार मुस्लिम समाज छोटा कब्रस्थानमध्ये दोन रूम

पंढरपूर शहरातील मुस्लिम समाजाची अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. त्यामध्ये सांगोला रोड वरील छोटा कब्रस्थानमध्ये दफणविधीचे सामान ठेवण्यासाठी दोन रूम बांधण्याच्या मागणीसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांना शहीद टिपू सुलतान युवक संघटना व मुस्लिम समाजातील बांधवांकडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. त्यास यश आले असून लवकरच त्या ठिकाणी आमदार निधीतून दोन रूम बांधून देण्यात येतील असे आश्वासन आ.आवताडे यांनी दिले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी यांनी दिलेली आहे. यावेळी नगरसेवक डि.राज सर्वगोड, बाबा ग्रुपचे संस्थापक उत्तम चव्हाण, आदम बागवान उपस्थित होते.
प्रथमत: समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत विजय संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर शहरातील बडा कब्रस्थान व छोटा कब्रस्थान यामध्ये अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. त्या ठिकाणी दफणविधीसाठी आल्यानंतर मुस्लिम समाजातील बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याची माहिती संघटना व मुुस्लिम बांधवांच्यावतीने आ.आवताडे यांना देण्यात आली त्यानंतर त्यांनी तात्काळ या विषयावर सकारात्मकता दर्शवून दोन रूम बांधून देणार असल्याचे सांगितले. शहीद टिपु सुलतान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी हे मुस्लिम समाजाच्या प्रलंबित मागण्यांबरोबरच बडा व छोटा कब्रस्थान येथील समस्यांवर आवाज उठवून ते काम पूर्णत्वास नेत आहेत  त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांतून त्यांचे आभार मानले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *