कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व “कॅस्पर” यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. “कॅस्पर” क्षेञांमध्ये काम करण्यास प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन संधी निर्माण करण्याच्या हेतुने हा सामंजस्य करण्यात आला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील सह-संस्थात्मक देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांच्या […]
Uncategorized
‘फॅबटेक’ विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यासाठी सतत प्रयत्नशील- बाळकृष्ण शिंपूकडे
आजकाल आपल्या भारत देशात विदेशी कंपन्यांचे जाळे वाढत चालले असुन आपल्या देशातील साधन- संपत्ती विविध स्वरुपात परदेशात जाऊ लागली आहे, यावर प्रतिबंध म्हणून प्रत्येक भारतीय नगरिकाने स्वदेशिचा अंगीकार केला पाहिजे,असे प्रतिपादन उद्योजक बाळकृष्ण शिंपूकडे यानी केले. फॅबटेक पॉलीटेक्नीकने आयोजित केलेल्या उद्योजकता विकास शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते, या वेळी कॅम्पस […]
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण आणि गुणगौरव समारंभ संपन्न
बुधवार, दि.३०.०३.२०२२ रोजी पंढरपूर येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित ‘कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचा वार्षिक बक्षिस आणि गुणगौरव समारंभ ह.भ.प.डॉ.जयंत करंदीकर आणि संस्थेचे चिफ ट्रस्टी रोहनजी परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाला. कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत वर्षभर विविध स्पर्धा घेण्यात येतात. त्या स्पर्धकांमधून विद्यार्थ्यांना व्यवहारीक जिवनातील व शालेय जिवनातील विविध स्पर्धांना सामोरे जाण्याकरीता प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये विविध स्पर्धा घेवून वेळोवेळी विद्यार्थ्यांतील लपलेल्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. या बक्षिस वितरणाच्या सोहळ्याला संस्थेचे चिफ ट्रस्टी रोहनजी परिचारक यांनी महत्वपुर्ण हजेरी लावली. कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे ह.भ.प. जयंत करंदीकर यांनी विद्यार्थ्यांना अगदी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी तीन आर चा उपयोग कसा करावा? हे अगदी सोप्या भाषेत सांगितले.संस्थेचे चिफ ट्रस्टी रोहनजी परिचारक यांनी विद्यार्थ्यांना बोलताना म्हणाले की, आपली प्रशाला ही विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी वैशिष्ट्यपुर्ण स्पर्धांचे आयोजन करत असते त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकुन राहण्यासाठी ही एक महत्वाची बाब आहे. तसेच विद्यार्थ्यांनी देखील या होणा-या शालेय स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे. या कार्यक्रमास उपस्थित प्रशालेच्या प्राचार्या सोनाली पवार आणि रजिस्ट्रार गणेश वाळके यांनी विद्यार्थ्यांना पुढील जिवनासाठी कौतुक करून भावी आयुष्याकरिता आशिर्वाद दिले. कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडण्याकरीता प्रशालेचे शिक्षक मंगेश भोसले यांनी प्रभावी सुत्रसंचालन केले. तसेच बक्षिसाचे सर्व वितरण कविता टीचर यांच्यासह सहकारी शिक्षकांनी उत्तम प्रकारे करण्यास हातभार लावला.
वंचित बहुजन आघाडीच्या पंढरपूर शहर अध्यक्षपदी राजाभाऊ शिंदे यांची निवड
वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पंढरपूर शहर कार्यकारणीच्या विविध पदाधिकाऱ्यांची घोषणा केली असून पंढरपूर शहर अध्यक्षपदी सदभावना सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पंढरपूर शहरात वंचित घटकांसाठी अतिशय तळमळीने विधायक उपक्रम राबविणारे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारे राजाभाऊ शिंदे यांची निवड करण्यात आली […]
‘विठ्ठल’च्या निवडणुकीचा बिगुल वाजणार
कोरोनाचे संकट लक्षात घेत राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने तसेच विविध प्रवर्गातील सहकारी संस्था यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता.त्यामुळे अनेक सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले तर अनेक सहकारी साखर कारखान्यच्या विद्यमान संचालक मंडळास कार्यकाळ संपल्यानंतर मुदतवाढ देण्यात आली होती.सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी,विठ्ठल सहकारी,सहकार शिरोमणी व दामाजी सहकारी साखर कारखानाच्या विद्यमान संचालक मंडळाचा […]
पंढरपूर नगर पालिकेत मोठी घडामोड,मुख्याधिकारी पाठवणार ‘त्या’ दोघांचा नगर रचना सहसंचालकांकडे अहवाल
पंढरपूर नगर पालिकेत नगर रचना विभागाच्या प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्याकडून सर्वसामान्य जनतेची मोठी अडवणूक होत असल्याची चर्चा मागील २ वर्षाच्या कालावधीत सातत्याने होत आली होती.बांधकाम परवाने आणि वापर परवाना निर्गमित करण्याचे अधिकार या नगर रचनाच्या अधिकाऱ्याकडे असल्याने मनमानी पद्धतीने कारभार केला जातोय अशा तक्रारी वेळोवेळी सामान्य नागिरकांकडून करण्यात येत होत्या.बांधकाम परवाना अथवा वापर परवाना प्राप्त करण्यासाठी दिवसा […]
जे कट्टर शिवसैनिकांच्या मनात तेच आ.तानाजी सावंत यांच्या ओठात ?
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेस भले जिल्हा परिषद,पंचायत समिती,जिल्हा बँक,दूध संघ आणि आमदारकी पदरात पाडून घेणे गेल्या २५-३० वर्षाच्या राजकरणात अपवादाने जमले असले तरी सामान्य जनतेच्या हितासाठी,न्यायासाठी लढणारे शिवसैनिक हीच तर खरी शिवसेनेची जिल्ह्यात ओळख राहिली आहे.सत्ता असो अथवा नसो,त्यामुळेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक यांचा जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात मोठा वचक असल्याचे मागील ३० वर्षात पहावयास […]
पंढरपुर एसटी आगाराच्या चालकास झोप लागलीअन मोबाईल आणि होंडा शाईन दुचाकी कुणीतरी लंपास केली
पंढरपूर एसटी आगारात चालक म्हणून काम करणारे कैलास भानुदास गायकवाड वय-52वर्षे व्यवसाय -एस.टी चालक रा.परितेवाडी ता माढा हे दिनांक 24/03/2022 रोजी रात्री 10/00 वाचे सुमारास मोटारसायकल घेवुन पिशवीमध्ये नविन घेतलेला मोबाईल ठेवुन सदर पिशवी मोटार सायकलाल अडकावुन परिते येथे जात असताना अहिल्या चौकापुढे खेडलेकर मठासमोर थोड्याअंतरावर गेलो असता माझी मोटारसायकल बंद पडली म्हणून मी रस्त्याचे […]
पंढरपूरच्या क्रीडा संकुलाचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवा
राज्य शासनाने तालुका पातळीवर क्रीडापटूंना व क्रीडाप्रेमींना सरावासाठी सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल उपलब्ध व्हावे यासाठी ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानंतर मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यातील क्रीडा संकुलाचे प्रस्तावही तेथील स्थानिक नेत्तृत्वाकडून पाठपुरावा केल्याने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर झाले.पंढरपुर शहर व तालुक्याचा विचार करता या तालुक्यात विविध क्रीडा प्रकारात नेपुण्य प्राप्त असलेल्या क्रीडापटूंची संख्या […]
शेगाव दुमाला परिसर बनला वाळू चोरीचा हॉटस्पॉट ?
पंढरपूर शहरालगत असलेल्या चंद्रभागा नदी काठावरील शेगाव दुमाला येथून गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार अवैध वाळू उपसा होत असल्याच्या घटना पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाल्या आहेत.अनेकवेळा वाहने ताब्यात घेतली गेली आहेत आणि गुन्हेही दाखल झाले आहेत.यातील बहुतांश वाहने हि नंबरप्लेट नसलेली आढळून आली आहेत.अवैध वाळू उपसा करणारी वाहने सुसाट वेगाने जातं असल्याने अनेक वेळा अपघाताच्या […]











