Uncategorized

शेगाव दुमाला परिसर बनला वाळू चोरीचा हॉटस्पॉट ?

पंढरपूर शहरालगत असलेल्या चंद्रभागा नदी काठावरील शेगाव दुमाला येथून गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार अवैध वाळू उपसा होत असल्याच्या घटना पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाल्या आहेत.अनेकवेळा वाहने ताब्यात घेतली गेली आहेत आणि गुन्हेही दाखल झाले आहेत.यातील बहुतांश वाहने हि नंबरप्लेट नसलेली आढळून आली आहेत.अवैध वाळू उपसा करणारी वाहने सुसाट वेगाने जातं असल्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत.मात्र विना नंबरची वाहने असल्याने पोलिसांनाही कारवाई करण्यात अडथळे येत असल्याचे दिसून आले आहे.एकीकडे गेल्या २-३ वर्षात शेगाव दुमाला येथून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर पोलिसांकडून शंभरपेक्षा जास्त कारवाया झालेल्या असतानाच महसूल प्रशासनाचे संबंधित तलाठी,मंडळ अधिकारी व पोलीस पाटील यांनी कारवाई केल्याचे उदाहरण अतिशय दुर्मिळ आहे.
        ६ वर्षांपुवी शेगाव दुमाला हद्दीतील वाळू घाटाचा लिलाव  करण्याच्या निर्णय घेत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निविदा निविदा प्रक्रियाही राबविली.मात्र शेगाव दुमाला येथील काहीजणांनी थेट हायकोर्टात जाऊन पर्यावरणाची हानी होतेय हे कारण पुढे करत यास स्थगिती आणली.६ कोटी रुपये बोली लावण्यात आलेला येथील वाळू साठ्याचा लिलाव स्थगित झाला.मात्र लिलाव थांबला तरी येथून होणार अवैध वाळू उपसा काही थांबला नाही.अगदी भाविकांच्या स्नानासाठी बांधलेल्या चंद्रभागा नदीवरील विष्णुपद दारे मोकळे करण्याचे प्रकार देखील वारंवार निदर्शनास आले आहेत.गतवर्षी जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्राप्त झालेल्या वाळू घाटाच्या मोजणी अहवालाची माहिती घेतली असता या ठिकाणी किती वाळू साठा उपलब्ध आहे याची सविस्तर माहिती मिळेल.मात्र त्यानंतर गौण खनिजाच्या पालकत्वाची जबाबदारी असलेल्या महसूल प्रशासनाने वेळोवेळी कधी ईटीएस प्रणालीद्वारे येथील वाळू साठ्याची मोजणी केली आहे का असाच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.आणि तालुका पोलीस वारंवार येथील अवैध वाळू उपशावर कारवाई करत असताना महसूल प्रशासनाकडून किती कारवाया करण्यात आल्या,दंडात्मक कारवाया किती झाल्या याची माहिती दिली जाणार का असाच प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
 १० दिवसापूर्वीच शेगाव दुमाला परिसरातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांनी कारवाई केली होती.आता दि. 28/03/2022 रोजी पहाटे करण्यात आलेल्या कारवाईत १) स्वराज्य कंपनीचा लाल रंगाचा 855 FE मडेल ट्रक्टर क्र एम.एच. 12 बी.बी.3843 पाठीमागील एक बिगर नंबरची डंम्पींग ट्राँली एक वाळुसह ताब्यात घेण्यात आला आहे तर दुसऱ्या कारवाईत स्वराज्य कंपनीचा लाल रंगाचा 855 FE मडेल असलेला ट्रक्टर नं. एम.एच. 25 एच. 3564 लालसर रंगाची बिगर नंबरची डंम्पींग ट्राँली व १ ब्रास वाळूसह ताब्यात घेण्यात आला आहे.
या दोन वेगवेगळ्या कारवाईत दत्तात्रय मारुती पाटोळे तसेच सागर राजाराम डोंगरे यांचे विरुध्द भादंवि कलम 379, 34 गौण खनिज कायदा कलम 4(1), 4(क), 1, 21 व सार्व.मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *