Uncategorized

वंचित बहुजन आघाडीच्या पंढरपूर शहर अध्यक्षपदी राजाभाऊ शिंदे यांची निवड

वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पंढरपूर शहर कार्यकारणीच्या विविध पदाधिकाऱ्यांची घोषणा केली असून पंढरपूर शहर अध्यक्षपदी सदभावना सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पंढरपूर शहरात वंचित घटकांसाठी अतिशय तळमळीने विधायक उपक्रम राबविणारे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारे राजाभाऊ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.तर उपाध्यक्षपदी लालबहादूर उर्फ रवी वाळके,दिलीप सर्वगोड,ईश्वर खंडेलवाल यांची निवड करण्यात आली आहे.
  वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आज जाहीर केलेल्या पंढरपूर शहर कार्यकारिणीच्या पदाधिकारी निवडीमध्ये सुनील केराप्पा दंदाडे व सतीश धोंडीराम सातपुते  यांची महासचिव पदी तर रवींद्र दिलीप सर्वगोड (उपाध्यक्ष),संतोष नारायण आगवणे (सचिव) ईश्वर खंडेलवाल (उपाध्यक्ष) संतोष कोरे (कोषाध्यक्ष),संतोष अंकुशराव (संघटक) तर संघटकपदी प्रकाश मोदी,प्रसिद्धी प्रमुखपदी धनंजय नांदरे यांच्या निवडी करण्यात आल्या असून कार्यकारणी सदस्यपदी साहिल माने,दादा शेळके,राजू पवार देविदास मोरे,किशोर सुरवसे,संजय वाघमारे,सूरज मोरे,अप्पा अभंगराव,गणेश शिंगाडे,किरण गिरीगोसावी,यश चव्हाण गणेश माळी,निलेश गोसावी यांची निवड करण्यात आली आहे.     
  या निवडीची घोषणा होताच सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात असून सर्वसामान्य कष्टकरी वंचित घटकांसाठी पंढरपुर शहर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सदैव सर्व कार्यकारिणी सदस्य व सर्व कार्यकर्ते सदैव परिश्रम घेऊ अशी प्रतिक्रिया नूतन शहर अध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *