Uncategorized

जे कट्टर शिवसैनिकांच्या मनात तेच आ.तानाजी सावंत यांच्या ओठात ?

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेस भले जिल्हा परिषद,पंचायत समिती,जिल्हा बँक,दूध संघ आणि आमदारकी पदरात पाडून घेणे गेल्या २५-३०  वर्षाच्या राजकरणात अपवादाने जमले असले तरी सामान्य जनतेच्या हितासाठी,न्यायासाठी लढणारे शिवसैनिक हीच तर खरी शिवसेनेची जिल्ह्यात ओळख राहिली आहे.सत्ता असो अथवा नसो,त्यामुळेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक यांचा जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात मोठा वचक असल्याचे मागील ३० वर्षात पहावयास मिळाले.२५ वर्षांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी दस्तुरखुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेचा मुख्यमंत्री आरूढ झाला पण सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना हि सध्यातरी अदखलपात्र असल्याचेच राष्ठ्रवादी कॉग्रेसच्या पालकमंत्र्यांसह विविध नेते मंडळींनी दाखवून दिले आहे असेच म्हणावे लागेल.आज शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी राष्ठ्रवादी कॉग्रेस बद्दल सोलापुरातील युवा सेनेच्या कार्यक्रमात बोलताना नाराजी व्यक्त करत जिल्ह्यातील शिवसेनेत असेलल्या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली असली तरी शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख या नात्याने आमदार तानाजी सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यातील कुठल्या कुठल्या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या शासन दरबारी मांडल्या आणि या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला याचाही पाढा आजच्या सोलापुरातील बैठकीत वाचला असता तर बरे झाले असते अशीही चर्चा आता शिवसेना सर्मथकांमध्ये होऊ लागली आहे.     

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *