आजकाल आपल्या भारत देशात विदेशी कंपन्यांचे जाळे वाढत चालले असुन आपल्या देशातील साधन- संपत्ती विविध स्वरुपात परदेशात जाऊ लागली आहे, यावर प्रतिबंध म्हणून प्रत्येक भारतीय नगरिकाने स्वदेशिचा अंगीकार केला पाहिजे,असे प्रतिपादन उद्योजक बाळकृष्ण शिंपूकडे यानी केले. फॅबटेक पॉलीटेक्नीकने आयोजित केलेल्या उद्योजकता विकास शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते, या वेळी कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय आदाटे, प्राचार्य शरद पवार, प्रतिभा शिंपूकडे आदि उपस्थित होते.
शिंपूकडे परिवार आठ कंपनीचे मालक असुन उद्योजकता यशस्वी होण्याचा कानमंत्र यावेळी त्यानी दिला. त्याच प्रमाणे यशस्वी उद्योगासाठी नवनवीन कल्पना,परवाना, मागणी,नुतनीकरण व जनरल मार्केटिंग कसे करावे यावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
फॅबटेक कॉलेजला मुळातच औद्योगिक क्षेत्राचे पाठबळ लाभल्यामुळे हे महाविद्यालय विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. त्यासाठी तरुण उद्योजकतेला प्रेरीत करण्यासाठी भविष्यात आणखी अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेचे चेअरमन मा. श्री भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ .साहेबगौडा सांगनगौडर, प्रा. तन्मय ठोंबरे तसेच ,प्रा.तानाजी बुरुंगले यांनी परिश्रम घेतले.
