Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न

सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे, संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये “जागतिक महिला दिन” सोहळा मोठ्या  उत्साहात  संपन्न झाला.      संसारात जीवन  जगत असताना  दररोजच्या  घाईगडबडीतुन  एक दिवस तरी स्वतःसाठी मोकळेपणाने जगूया हाच उद्देश घेऊन आजचा “जागतिक महिला दिन”  साजरा करण्यामागचा उद्देश होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  डॉ. संगीता पाटील होमिओपॅथी कन्सल्टंट , मानसोपचार तज्ञ तसेच सौ. सुरेखा रुपनर, सौ. सारिका रुपनर, संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील  उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.  उपस्थित मान्यवरांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला पालक यांना  जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.    आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांनी स्वतःकडेही लक्ष दिले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे डॉ. संगीता पाटील यांनी  उपस्थित महिलांसमोर  बोलताना सांगितले.त्याचबरोबर  खाण्यात येणाऱ्या पदार्थांमुळे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात आणि तोटे होतात हेही त्यांनी सुंदररित्या समजावून सांगितले.     जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांनासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. […]

Uncategorized

महिलांनी पुढाकार घेऊन सामाजात विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला पाहिजे:-सीमा परिचारक

महिलांनी पुढाकार घेऊन सामाजात विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला पाहिजे असे प्रतिपादन जागतिक महिला दिना निमित्ताने पंढरपूर तालुका शिक्षक समिती महिला आघाडी यांच्या वतीनं कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानावेळी सीमाताई परिचारक यांनी केले आहे. सुरुवातीला क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मा सौ.सीमाताई परिचारक, सौ.विनयाताई परिचारक, सौ रजनीताई देशमुख, सौ अर्चना व्हरगर, सौ. राजश्री भोसले सुरेखा इंगळे,तालुकाध्यक्षा […]

Uncategorized

“कर्मयोगी किड्स फॉउंडेशन सी.बी.एस.ई. स्कूल पंढरपूर येथे ‘मोफत कौशल्य विकास शिबिराची’ सांगता”

पंढरपूर- आज शनिवार, दि. ०५.०३.२०२२ रोजी कर्मयोगी किड्स फॉउंडेशन स्कूल पंढरपूर येथे मोफत कौशल्य विकास शिबीर आयोजनाचा सांगता समारंभ पार पडला. मागील दोन वर्षांपासून कोरोना मूळे शाळा बंद असल्यामुळे लहान मुलांना शाळेत जाता आले नाही. त्यामुळे अशा मुलांसाठी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन रोहन परिचारक सर (ट्रस्टी कर्मयोगी प्रतिष्ठान पंढरपूर ) यांच्या संकल्पनेतून अशा विद्यार्थ्यांसाठी २० […]

Uncategorized

भाजप सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप माने यांची निवड

भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप सुभाष माने यांची निवड करण्यात आली आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी ,युवक नेते प्रणव परिचारक, तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे ,सोमनाथ अवताडे,बादलसिंह ठाकुर, धीरज म्हमाने,यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीनंतर संदीप माने यांचे अभिनंदन केले जात असून […]

Uncategorized

कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांची टी.सी.एस. मध्ये निवड

कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस (टी.सी.एस) या नामांकित कंपनीमध्ये मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस लिमिटेड या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागातील सुप्रिया गुंड या विद्यार्थिंनींची तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील आनंद पाटील या विद्यार्थ्याची निवड करण्यात […]

Uncategorized

भाजपच्या पंढरपूर तालुका अल्पसंख्यांक आघाडीच्या अध्यक्षपदी तमिम इनामदार यांची निवड

भाजपच्या पंढरपूर तालुका अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्षपदी तमीम सय्यद इनामदार यांची निवड करण्यात आली आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते तमीम इनामदार यांना या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे,युवक नेते प्रणव परिचारक,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के,सोमनाथ आवताडे, तालुका अध्यक्ष भास्कर कसगवडे यांच्यासह भाजपचे विविध […]

Uncategorized

बनावट आधार कार्ड तयार करून मयताच्या जमिनीची विक्री

पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी गट नं 146क्षेत्र 1 हेक्टर 3 आर पोटखराब 0हेक्टर19आर आकार या जमिनीच्या खरेदी विक्री दस्त नोंदणी  दिनांक 14/10/2021रोजी खरेदी दस्त क्र4492/21नुसार करण्यात आली असून सदर मिळकतीचा मालक नमूद आण्णा दानोळे/पंढरपूर हे मयत असताना त्या ठिकाणी तोतया व बनावट व्यक्ती उभी करुन सदरचा दस्त नोंदविलाअसल्याचा प्रकार घडला असून बनावट आधार कार्ड तयार करून […]

Uncategorized

सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी बजरंग बागल व सुहास भाळवणकर यांची निवड

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, खा.राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्षा आ.प्रणिती शिंदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील, सहप्रभारी सोनल पटेल, जिल्हा प्रभारी मोहन जोशी, सहप्रभारी चेतन चव्हाण यांच्या मान्यतेने पंढरपूर येथील बजरंग […]

Uncategorized

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न ?

शेगाव दुमाला ता.पंढरपुर येथील मारुती आटकळे यांचे शपिंग कम्पलेक्सचे गाळ्यामध्ये ई कॉम एक्सप्रेस लि.या कुरिअर कंपनीचे डिलिव्हरी ऑफिस असून शशिकांत चंद्रकांत तेलकर सध्या रा घर नं 674 अ (3) जुना सरकारी दवाखान्याजवळ, कोळी गल्ली पंढऱपुर हे शाखा प्रमुख म्हणून काम करतात.त्यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी नुसार दि. 26/02/2022 व दि. 27/02/2022 रोजीचे […]

Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा संयुक्त जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

भिमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशिय सामाजिक संस्था व रमामाता महिला व अखंड मराठी न्यूज ,पंढरपूर आयोजीत संतोषजी सर्वगोड मित्र मंडळ व राहुल (दादा) मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे बाबा यांच्या संयुक्त जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धांचे आयोजीत करण्यात आले दि,२७/०२/२०२२रोजी सकाळी १०:०० वाजता या स्पर्धा गौतम विद्यालय मध्ये घेण्यात आल्या तरी या स्पर्धेमध्ये ६०स्पर्धकांनी […]