कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस (टी.सी.एस) या नामांकित कंपनीमध्ये मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस लिमिटेड या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागातील सुप्रिया गुंड या विद्यार्थिंनींची तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील आनंद पाटील या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. त्यांना वार्षिक 3.6 लाखांचे पॅकेज मिळाले आहे. टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस लिमिटेड ही माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करणारी जगातील प्रख्यात भारतीय कंपनी आहे.
दर वर्षी कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये विविध बहुराष्ट्रीय कंपन्या येत असतात व पात्र विद्यार्थ्यांची निवड करतात. कर्मयोगीमधील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारे प्रशिक्षण अभियांत्रिकीच्या दुसर्या वर्षा पासून च दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्याधीच नोकरी मिळण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.
लॉकडाउन व कोरोंना महामारीच्या संकटामध्ये सापडलेल्या बॅच ची सर्वाधिक काळजी कर्मयोगी ने घेऊन त्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रशिक्षण देऊन व मुलाखतीसाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून आज त्यांचे विविध नामांकित कंपनीमध्ये निवड होत असल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात आनंदाचे वातावरण आहे. कर्मयोगी पॅटर्न व विद्यार्थ्यांचे कष्ट म्हणजेच हमखास यश हे समीकरण विद्यार्थ्यानी पुन्हा एकदा दाखवून दिले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. डी. बी. शिवपूजे, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागाचे प्रमुख प्रा. एस एम कुलकर्णी तसेच इतर सर्व विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.