महिलांनी पुढाकार घेऊन सामाजात विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला पाहिजे असे प्रतिपादन जागतिक महिला दिना निमित्ताने पंढरपूर तालुका शिक्षक समिती महिला आघाडी यांच्या वतीनं कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानावेळी सीमाताई परिचारक यांनी केले आहे.
सुरुवातीला क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मा सौ.सीमाताई परिचारक, सौ.विनयाताई परिचारक, सौ रजनीताई देशमुख, सौ अर्चना व्हरगर, सौ. राजश्री भोसले सुरेखा इंगळे,तालुकाध्यक्षा देवकी दुधाणे,चंद्रकला खंदारे यांचे शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यावेळी सीमाताई परिचारक यांनी सांगितले महिला सर्वच क्षेत्रात कार्यरत असून महिलांचा आदर सर्वांनी राखला पाहिजे.महिलांनी चुल आणि मुल न पाहता बाहेरच जग पाहून आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देऊन जगल पाहिजे, स्वतःच्या आरोग्यासाठी जागरूक राहिले पाहिजे, यानंतर रजनीताई देशमुख यांनी मनोगत व्यक्त केली.त्यानंतर जागतिक महिला दिनाच औचित्य साधून पंढरपूर तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला, त्यामध्ये शुभांगीताई मनमाडकर,वृंदागीर गोसावी,डॉ मधूरा जोशी,मनिषा ढोबळे,विद्या रेपाळ,अंजली टकले,कुमूदिनी सरदार, रेखा काळे,राणी दुधाणे, सोनीया थोरात,धनश्री काकडे,स्मिताताई सरदेशमुख,नंदा मोहिते, दीपाली वरुडे,मंगल माने या सर्वक्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सन्मानित प्रतिनिधी सोनीया थोरात, धनश्री काकडे यांनी मनोगतात सर्व महिलांना एक प्रकारची प्रेरणा देण्याच काम शिक्षक महिला आघाडी न केलय मनापासून ऋण व्यक्त केले.यानंतर डॉ मधूरा जोशी यांच आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना महिलांनी आरोग्याविषयी काय काय काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवकी दुधाणे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल आमले मंजिरी देशपांडे सुजाता गुरसाळकर अनिता तरकसबंद यांनी केले. आभार सारिका फासे यांनी मानले.महिला आघाडीचा हा पहिलाच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना कोळी,अनिता वेळापूरकर, संगीता कापसे,आनिता माने,स्मिता कल्याणकर,सुरेखा उत्पात,निता सितापराव,प्रज्ञा कुलकर्णी,स्वाती पंचवाडकर, वैशाली वाघमारे,सुवर्णा टकले,सुनंदा गुळमे,सुप्रिया आमले,योगीता अडगळे,विजया पवार मंगल जाधव,शितल निमकर,यांचे बरोबर सुनील कोरे,सचिन लादे,पोपट कापसे,दत्तात्रय खंदारे,गुंडीबा कांबळे,संतोष कांबळे,हेमंत माने सुनिल अडगळे,ज्ञानेश्वर मोरे,संतोष कापसे,रमेश खारे,एकनाथ कुंभार,विजय जाधव,रावण मदने,आण्णासाहेब रायजादे,अविनाश बुरांडे,राजेंद्र खपाले, संतोष थोरात ज्ञानेश्वर दुधाणेअधिक परिश्रम घेतले.