Uncategorized

भाजपच्या पंढरपूर तालुका अल्पसंख्यांक आघाडीच्या अध्यक्षपदी तमिम इनामदार यांची निवड

भाजपच्या पंढरपूर तालुका अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्षपदी तमीम सय्यद इनामदार यांची निवड करण्यात आली आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते तमीम इनामदार यांना या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे,युवक नेते प्रणव परिचारक,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के,सोमनाथ आवताडे, तालुका अध्यक्ष भास्कर कसगवडे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचे नूतन तालुका अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष तमिम इनामदार हे कट्टर परिचारक सर्मथक म्हणून ओळखले जात आले असून पंढरपूर शहर व तालुक्यातील युवकांमध्ये एक धडाडीचा आणि सातत्याने सर्वसामान्य कुटूंबातील युवक आणि परिचारक यांच्या मधील संपर्काचा दुवा म्हणून कार्यरत राहिलेले युवक अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
या निवडीनंतर तमिम इनामदार यांचे अभिनंदन केले जात असून या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पंढरी वार्ताशी बोलताना त्यांनी या निवडीबद्दल आभार मानत अल्पसंख्याक समाज हा कष्टकरी आणि रोजच्या उत्पन्नावर गुजराण करणारा समाज आहे.पक्षाने सोपविलेली जबाबदारी आपण अहोरात्र परिश्रम घेऊन निष्ठेने पार पाडू व केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ,या समाजाचे प्रश्न यासाठी मा.आ.प्रशांत परिचारक यांच्यासह सर्वच जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेऊ अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *