Uncategorized

बनावट आधार कार्ड तयार करून मयताच्या जमिनीची विक्री

पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी गट नं 146क्षेत्र 1 हेक्टर 3 आर पोटखराब 0हेक्टर19आर आकार या जमिनीच्या खरेदी विक्री दस्त नोंदणी  दिनांक 14/10/2021रोजी खरेदी दस्त क्र4492/21नुसार करण्यात आली असून सदर मिळकतीचा मालक नमूद आण्णा दानोळे/पंढरपूर हे मयत असताना त्या ठिकाणी तोतया व बनावट व्यक्ती उभी करुन सदरचा दस्त नोंदविलाअसल्याचा प्रकार घडला असून बनावट आधार कार्ड तयार करून सदर खरेदी दस्त अस्तित्वात आणला गेला आहे.खरेदी देणार आण्णा दानोळे हा इसम दि.10/08/1990 रोजी मौजे शेडबळ ता.अथणी जि.बेळगाव येथे मयत झाला आहे असे असताना यातील तोतया व्यक्तीने सदरची मिळकत ही शंकर पांडूरंग हिवरकर यास विकलेबाबतचा खरेदीखत नावाचा दस्त अस्तित्वात आणलेला आहे सदरचा दस्त हा नमूद आण्णा दानोळे यांचे बनावट आधारकार्ड बनवून तोतया व्यक्तीने आधार कार्डवर रा.लक्ष्मी मंदीराजवळ माळेवाडी कोल्हापूर हा पत्ता टाकून बनविलेले आहे परंतु यातील मयत दानोळे हे मौजे शेडबाळ ता.अथणी येथे वास्तव्यास होते व त्यांचा मृत्यू देखील शेडबाळ येथेच झालेला आहे त्यांचा मुलगा म्हणजेच बापू दानोळे पंढरपूरे हे ही सध्या मयत आहेत.
या बाबत रावसाहेब बापु पंढरपुरे व बाळासाहेब बापु पंढरपुरे यांनी या खरेदीखता संदर्भात पंढरपूर दुय्यम निबंधक १ अनिल चाटे यांच्याकडे ४ महिन्यापूर्वीच तक्रार केली होती.व या बाबत त्यांनी सत्यताने पाठपुरावा केला होता.मयत दानोळे हे मौजे शेडबाळ तालुका अथणी येथे वास्तव्यास होते व त्यांचा मृत्यू देखील शेडबाळ येथेच झालेला आहे त्यांचा मुलगा म्हणजेच बापू दानोळे  हे ही सध्या मयत आहेत.मयतास सध्या वरील तक्रारी अर्जदार कायदेशीर वारसदार आहेत हे निदर्शनास आणून दिले होते.
सदरचा दस्त हा नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 नुसार दस्त नोंदणीसाठी तोतया व्यक्ती उभा करुन दस्त नोंदणी केली असुन हे गैरकृत्य केल्याचे दिसून आल्याने खोटी दस्त नोंदणी करुन फसवणुक केली आहे अशी फिर्याद अनिल चाटे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *