अखिल भारतीय सुवर्णकार समाज विकास एव शोध संस्थेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये पंढरपूर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब किसन इंदापूरकर यांची तर उपाध्यक्षपदी अरुणशेठ शामराव राजूरकर यांना निवडीचे पत्र करण्यात आले. याच बरोबर यावेळी इतर पदाधीकाऱ्याची निवड करण्यात आली असून आहे. सोमवारी झालेल्या समाजाच्या बैठकीत नव्याने नियुक्त करण्यात आलेले पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत.सचिव-औदुंबर अदापुरे,सह सचिव-विष्णु भगवान इंदापूरकर,खजिनदार- महेश […]
Uncategorized
चर्चा समाधान आवताडेंना दोन पक्षाच्या ऑफरची आणि जिल्ह्यातील बडया नेत्याच्या ”विदुर” नीतीची
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार स्व.भारतनाना भालके यांच्या निधनानंतर या दोन्ही तालुक्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात परिचारक सर्मथक आणि परिचारक विरोधक असे दोनच गट अथवा पक्ष गेल्या चाळीस वर्षात ”प्रभावी” ठरले असून पारंपरिक राजकीय विरोधाच्या या लढाईत आता पंढरपूर तालुक्यात परिचारक याना खंबीरपणे विरोध करणारा नेता कोण ? असा प्रश्न […]
माघी एकादशीलाही विठ्ठू माऊली एकटीच!
पंढरपूर : आषाढी, कार्तिकी पाठोपाठ माघी एकादशीला लेकूरवाळी विठ्ठू माऊली एकटीच असणार आहे. लाखो वैष्णवांची यंदाची माघी वारी देखील चुकणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेवर निर्बंध घालण्यात आले आहे. पंढरीत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, विठ्ठल दर्शनही बंद ठेवण्यात आले आहे. तसेच शहरात २४ तास संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. २३ फेब्रुवारी […]
शिवजयंती निमित्ताने इसबावी मलपे चौक येथे रक्तदान शिबिर संपन्न
श्री.दत्त शिवजन्मोत्सव सोहळा समिती व माजी नगरसेवक बालाजी मलपे मिञ परिवाराच्या वतीने छञपती शिवाजी महाराज यांची पंढरपूर शहरातील इसबावी मलपे चौक येथे जयंती साजरी करण्यात आली यावेळी जयंतीच्या औच्यात्याने सामाजिक बांधिलकी जोपासत व महाराष्ट्र राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेला कमी रक्तसाठा व राज्याचे आरोग्य मंञी राजेश टोपे यांनी नागरिकांनी रक्तदान करण्यास समोर येण्याचे केलेल्या आव्हानास प्रतिसाद […]
पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस-छत्रपती संभाजी राजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यासह रायगडावरही उत्साहाचं वातावरण आहे. शिवजयंतीनिमित्त रायगडावर भारतीय पुरातत्व विभागाने रोषणाई केली आहे. मात्र, रायगडावर करण्यात आलेली रोषणाई पाहून छत्रपती संभाजीराजे भोसले हे चांगलेच भडकले आहेत. ‘ भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल,’ असा शब्दात संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला आहे. कोरोनामुळे शिवजयंती सोहळा […]
केसांमध्ये साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिमा
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा अगदी हुबेहुब केसांमध्ये ओके हेअर ड्रेसेसचे मालक तुकाराम चव्हाण यांनी साकारली असून दरवर्षी महापुरूषांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी महापुरूषांची प्रतिमा आपण युवकांच्या केसांमध्ये साकारत असल्याचे प्रतिपादन तुकाराम चव्हाण यांनी केले. तुकाराम चव्हाण हे पंढरपुरातील सलून व्यवसाय करणारे कलाकार असून त्यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे आराध्यदैवत […]
पंढरपूर तहसील कार्यालयात शेतकऱ्याचा टॉवरवर चढून आत्महत्येचा इशारा
पंढरपूर तालुक्यातील येथील देगाव शेतकरी कुबेर चिमाजी घाडगे शेतजमिनीच्या वादाबाबत न्यायालयाचे व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही कार्यवाही होत नसल्याने आज येथील तहसील कार्यालयातील टॉवरवर चढून गळ्याला दोरी बांधून ठिय्या मांडला असून आज ५ वाजेपर्यंत परस्पर एकत्र केलेला तक्ता नकाशा रद्द न केल्यास आपण आत्महत्या करणार आहे असा इशारा त्यांनी दिला आहे. कुबेर चिमाजी घाडगे यांनी दिलेल्या माहिती नुसार […]
सरकोलीच्या भीमा नदीकाठावरून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची पुन्हा कारवाई
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील भीमा नदीच्या पात्रातून सातत्याने अवैध वाळू उपसा होत असल्याच्या घटना तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस येत असून रविवारी रात्री पुन्हा एकदा पंढरपूर तालुका पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत एक टेम्पो,एक ट्रॅक्टर व वाळू असा ७ लाख ६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.गेल्या महिना भरात सरकोली परिसरातील भीमा नदीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशावरील तालुका […]
पंढरपुरातील ”ती” आगीची घटना संशयास्पद ?
दि. 11 फेब्रुवारी 2021 रोजी पहाटे पंढरपूर येथील भोसले चौकात काशीकापडी समाज बांधवांच्या जुन्या कपड्यांच्या गोडाऊनला अचानक मोठी आग लागली होती. या आगीत काशीकापडी समाजातील महिला भगिणींचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ही आग लागली का लावली गेली? हा प्रश्न निर्माण होत असुन याची सखोल […]
लोकनेते, दलितमित्र स्व.नारायणराव धोत्रे
लोकनेते स्व.नारायणराव धोत्रे यांची नगराध्यक्ष पदाची कारकीर्द मी अगदी जवळून पहिली आहे. त्यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे कामकाज नदीकाठच्या जुन्या इमारतीमधून चालत होते.बाबा कांबळे हे प्रशासनाधिकारी होते.आणि माझ्या मते नगराध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेची कुठलाही गाजावाजा न करता अतिशय समर्पक सुरूवात जर कोणी केली असेल तर स्व.नारायणराव धोत्रे यांनी. सर्वसामान्य नागरिक आणि नगरपालिकेचे पदाधिकारी,कर्मचारी यांच्यातील […]











