हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा अगदी हुबेहुब केसांमध्ये ओके हेअर ड्रेसेसचे मालक तुकाराम चव्हाण यांनी साकारली असून दरवर्षी महापुरूषांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी महापुरूषांची प्रतिमा आपण युवकांच्या केसांमध्ये साकारत असल्याचे प्रतिपादन तुकाराम चव्हाण यांनी केले.
तुकाराम चव्हाण हे पंढरपुरातील सलून व्यवसाय करणारे कलाकार असून त्यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल, श्री गणेश, क्रांतीसुर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वर्ल्ड कप यांच्यासह अनेक महत्वाच्या कलाकृती त्यांनी आजपर्यंत साकारलेल्या आहेत. तुकाराम चव्हाण हे सलून दुकान मालक संघटनेचे व्हा.चेअरमन म्हणून कार्यरत असून आजपर्यंत त्यांनी समाजसेवेमध्ये ही आपला वेगळा ठसा उमटविलेला आहे. त्यांच्या या कलाकृतीचे पंढरपूर शहरासह सोलापूर जिल्ह्यातील अनेकांतून कौतुक होत आहे.
