पंढरपूर : आषाढी, कार्तिकी पाठोपाठ माघी एकादशीला लेकूरवाळी विठ्ठू माऊली एकटीच असणार आहे. लाखो वैष्णवांची यंदाची माघी वारी देखील चुकणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेवर निर्बंध घालण्यात आले आहे. पंढरीत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, विठ्ठल दर्शनही बंद ठेवण्यात आले आहे. तसेच शहरात २४ तास संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. २३ फेब्रुवारी रोजी माघी एकादशी आहे
