Uncategorized

सरकोलीच्या भीमा नदीकाठावरून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची पुन्हा कारवाई 

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील भीमा नदीच्या पात्रातून सातत्याने अवैध वाळू उपसा होत असल्याच्या घटना तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस येत असून रविवारी रात्री पुन्हा एकदा पंढरपूर तालुका पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत एक टेम्पो,एक ट्रॅक्टर  व वाळू असा ७ लाख ६ हजारांचा  मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.गेल्या महिना भरात सरकोली परिसरातील भीमा नदीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशावरील तालुका पोलिसांची तिसरी कारवाई असल्याचे समजते.मात्र याच वेळी महसूल प्रशासनाकडून मात्र या परसिरात कारवाई होत नसल्याचे दिसून येते.पोलीस आणि महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई केली तर महसूलच्या नियमानुसार लाखो रुपयांची रक्कम दंडापोटी शासनास मिळू शकते.सरकोली येथून वारंवार होणाऱ्या वाळू उपशावरील पोलीस कारवाई बाबत येथील तलाठी श्री काळेल यांच्याशी संपर्क करून अधिक माहिती घेतली असता मी रहायला पंढरपुरात आहे,रात्रीच्या वेळी तिथे आम्ही कधी गेलोच तर काहीही दिसून येत नाही.सध्या पोटनिवडणुकीच्या कामात आहे त्यामुळे लक्ष देण्यास वेळ नाही असे सांगण्यात आले.
                रविवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजीच्या कारवाई बाबत तालुका पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादी नुसार चळे बिटचे पो.हे.काँ.विक्रम चांगदेव काळे याना मौजे सरकोली ता. पंढरपुर गावचे हद्दीतील पांडुरंग ज्ञानोबा भोसले याचे शेताजवळील भिमा नदीचे पात्रात एका टँम्पोमध्ये चोरुन वाळु भरत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने या याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक याना देऊन फिर्यादी काळे यांच्यासह पो.ना.ताटे,पो.क.बाबर खाजगी वाहनाने बातमीतील ठीकाणी गेले असता पांडुरंग ज्ञानोबा भोसले याचे शेताजवळील भिमा नदीचे पात्रात एक वाळुने भरलेला टँम्पोला लोखंडी रोपच्या साह्याने बांधुन एक ट्रँक्टर नदीपात्रातुन ओढत असताना दिसला. त्यावेळेस टँम्पोचे चालकास त्याचे नाव पत्ता व टँम्पोचे हौदामध्ये काय आहे असे विचारले असता त्याने त्याचे नाव दादासाहेब नंदकुमार भोसले वय.20 वर्ष रा सरकोली ता. पंढरपूर असे असल्याचे सांगितले व पाठीमागील हौदामध्ये वाळू असल्याचे सांगितले. त्यावेळेस टँम्पोचे पाठीमागील हौदामध्ये पाहिले असता वाळु दिसुन आली त्यावेळेस टँम्पोमधील वाळू वाहतूकीचे परवान्याबाबत विचारले असता त्याने वाळू भीमा नदीचे पात्रातून चोरून भरली असून वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगण्यात आले.आरोपी नामे 1)दादासाहेब नंदकुमार भोसले वय.20 वर्ष रा सरकोली ता. पंढरपूर 2) टँम्पोचा मालक नाव पत्ता माहित नाही 3)प्रताप नंदकुमार भोसले वय 24 वर्षे रा. सरकोली ता. पंढरपूर यांनी संगनमत करुन जलचर प्राण्याना उपयुक्त असणारी सरकोली गावचे हद्दीतील भीमा नदी पात्रातील वाळू शासनाची परवानगी शिवाय अवैध रित्या उपसा करुन शासनाची गौन खनिजाची चोरी करीत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्या विरोधात विरुद्ध भादवि 379, 34 सह गौण खनिज कायदा कलम 4(1)4(क)(1) व 21 प्रमाणे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *