Uncategorized

राष्ट्रवादी शिक्षक संघाकडून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

खा.शरदचंद्रजी पवार यांचे वाढदिवसानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने पंढरपुर तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये  1)आदर्श  प्राथमिक शिक्षक 2)आदर्श प्राथमिक शिक्षिका 3)आदर्श माध्यमिक शिक्षक 4)आदर्श माध्यमिक शिक्षिका 5)आदर्श कला/क्रिडा शिक्षक 6)आदर्श शिक्षकेतर कर्मचारी 7)आदर्श महाविद्यालय प्राध्यापक 8)आदर्श प्राथमिक मुख्याध्यापक 9)आदर्श माध्यमिक मुख्याध्यापक10) आदर्श लेखक/ […]

Uncategorized

आज दक्षिण काशी उत्तरेतील काशीकडे पाहून थोडी हळहळली असेल !

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे काशी कॅरिडॉरचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला.हा सोहळा पहात असताना दक्षिण काशी समजल्या जात असणाऱ्या आपल्या पंढरपूर बाबतही अनेक अपेक्षा मनातून उसळी घेऊ लागल्या,अनेक आश्वासने पुन्हा पुन्हा आठवू लागली आणि अनेक चांगली सकारात्मक कामांबद्दल थोडेफार समाधान वाटले पण एक खंत मात्र नक्कीच आहे.अजूनही खूप बकाल आणि […]

Uncategorized

स्वेरीत ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील विद्यार्थी देखील समरस होतात हे एक भविष्याच्या दृष्टीने प्रगतीचे पाऊल- शास्त्रज्ञ डॉ. यल्लोजीराव मिरजकर

‘विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून उत्तम करिअर घडविण्यासाठी स्वेरी ज्या प्रकारचे शिक्षण देते ती खरोखरच उल्लेखनीय बाब आहे. राज्यातील शिक्षण संस्थांनी स्वेरीचे अनुकरण केल्यास विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला नक्कीच अधिक गती येईल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी म्हणून स्थापन झालेल्या स्वेरीत आज ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील विद्यार्थी देखील समरस होतात हे एक भविष्याच्या दृष्टीने प्रगतीचे पाऊल आहे. स्वेरी […]

Uncategorized

फॅबटेकच्या विराज गावडे या विद्यार्थ्यांची टीसीएस व कॅपजेमिनी या नामांकित कंपनी मध्ये निवड

 येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या सिव्हिल इंजिनिअरिंग  विभागातील विराज गावडेची या  विद्यार्थ्यांची  टीसीएस व कॅपजेमिनी या नामांकित सॉफ्टवेअर कंपनी मध्ये निवड झाली असून त्यांना  वार्षिक ३.३६ लाखाचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. टीसीएस  हि अंतरराष्ट्रीय  आयटी कंपनी असून ती एक भारतातील दिगज्ज कंपनी […]

Uncategorized

कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना अर्ज करण्यासाठी मोफत नोंदणी सुविधा

कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्या  कुटूंबातील वारसांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अर्जासाठी शासनाने संकेतस्थळ विकसित केले असून, कुटूंबातील वारसांना अर्ज करताना कोणतेही अडचण येवू नये, यासाठी पंढरपूर तहसिल कार्यालय व तालुक्यातील सर्व महा-ई सेवा केंद्रावर दिनांक 11 व 12 डिसेंबर 2021 रोजी मोफत अर्जाची नोंदणी केली जाणार असल्याची माहिती […]

Uncategorized

स्वेरीच्या पाच विद्यार्थ्यांची ‘पॉश मेटल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमध्ये निवड

‘पॉश मेटल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.        ‘पॉश मेटल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या निवड […]

Uncategorized

फॅबटेकच्या प्रियांका तोंडले या विद्यार्थिनीस मिळाले ४.५ लाखाचे पॅकेज

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रियांका तोंडले या विद्यार्थिनीची  कॉग्निजेंट या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये  निवड झाली असून तिला ४.५ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची  माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. कॉग्नीजेंट हि आयटी सेक्टर मधील मल्टिनॅशनल कंपनी असून  भारताबाहेर अमेरिका, युरोप यासारख्या देशामध्ये या […]

Uncategorized

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयास केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सर्वोच्च ४ स्टारचे रेटिंग

येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयास संस्थांची इनोव्हेशन कौन्सिल (२०२०-२१) या गटातून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षांमध्ये उत्तम वार्षिक कामगिरी केल्याबद्दल महाविद्यालय आणि स्वतंत्र संस्था श्रेणी या गटातून शिक्षण मंत्रालयाचे सर्व ४ स्टारचे रेटिंग मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये (एच.ई.आय.) […]

Uncategorized

माजी उपनगराध्यक्ष हमीदभाई बागवान यांचे दुःखद निधन

पंढरपूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष,बागवान समाजाचे धाडसी आणि अभ्यासू नेते हमीदभाई लतीफ बागवान यांचे शनिवार दिनांक ४ रोजी पहाटे अल्पशा आजराने निधन झाले.सन २०११ ते २०१६ या कालावधीत त्यांनी पंढरपूर नगर पालिकेचे नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पाडली तर याच काळात त्यांनी उपनगराध्यक्ष पदही भूषविले.सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी अतिशय आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.हिंदू आणि मुस्लिम या […]

Uncategorized

लेखक अंकुश गाजरे यांच्या “सारीपाट” कथासंग्रहाला साहित्य पुरस्कार

शेळवे (ता.पंढरपूर) येथील ग्रामीण लेखक अंकुश गाजरे यांच्या “सारीपाट” कथासंग्रहाला राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत जयंती व पुण्यतिथी निमित्त “स्वदेशी भारत साहित्य सन्मान पुरस्कार” नुकताच आसू, (ता.फलटण) येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.. याप्रसंगी व्यासपीठावर ह.भ.प.पुरूषाेत्तम महाराज हिंगणकर, कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे,.प्रमाेद झांबरे, आयोजक कवी प्रकाश सकुंडे आदी मान्यवर उपस्थित हाेते. याच मान्यवरांच्या हस्ते लेखक […]