Uncategorized

फॅबटेकच्या प्रियांका तोंडले या विद्यार्थिनीस मिळाले ४.५ लाखाचे पॅकेज

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रियांका तोंडले या विद्यार्थिनीची  कॉग्निजेंट या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये  निवड झाली असून तिला ४.५ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची  माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.
कॉग्नीजेंट हि आयटी सेक्टर मधील मल्टिनॅशनल कंपनी असून  भारताबाहेर अमेरिका, युरोप यासारख्या देशामध्ये या कंपनीचा विस्तार आहे. अशी माहिती विभाग प्रमुख प्रा. सीएच मल्लारेडी यांनी सांगितले. कॉग्निजेंट हि  बिजनेस कन्सल्टिंग आयटी कंपनी असून वेगवेगळ्या आऊट सोर्सिंग  सर्व्हिसिंग देण्याचे कार्य करते. या कंपनीचे मेन ऑफिस यूएसए मध्ये असून भारतात देखील मोठे काम सुरु आहे. अशी माहिती ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर यांनी दिली.
    निवड झालेल्या या विद्यार्थिनीचे संस्थेचे चेअरमन  मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे  मॅनेजिंग  डायरेक्टर  श्री. अमित रुपनर, डायरेक्टर  श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा. मल्लारेडी, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर, पदवीचे प्लेसमेंट कॉ-ऑर्डिनेटर प्रा. शैलेश इटकलकर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *