खा.शरदचंद्रजी पवार यांचे वाढदिवसानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने पंढरपुर तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये
1)आदर्श प्राथमिक शिक्षक 2)आदर्श प्राथमिक शिक्षिका 3)आदर्श माध्यमिक शिक्षक 4)आदर्श माध्यमिक शिक्षिका 5)आदर्श कला/क्रिडा शिक्षक 6)आदर्श शिक्षकेतर कर्मचारी 7)आदर्श महाविद्यालय प्राध्यापक 8)आदर्श प्राथमिक मुख्याध्यापक 9)आदर्श माध्यमिक मुख्याध्यापक10) आदर्श लेखक/ कवी 11) आदर्श शाळा प्राथमिक 12)आदर्श शाळा माध्यमिक
असे 12 पुरस्कार देण्यात येणार आहेत यासाठी
खालील दिलेल्या माहिती नुसार प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन करण्यात येत आहे.
1)शिक्षकाचे नाव
2)शाळेचे नाव
३)जन्म दिनांक
4)सेवेत रुजू दिनांक
5)एकूण सेवा
6)शैक्षणिक कार्य
7)सामाजिक कार्य
8)राष्ट्रीय कार्य
9)इतर शैक्षणिक उल्लेखनीय कामकाज.आदींचा समावेश असलेले प्रस्ताव दिनांक १८/१२/२०२१पर्यंत पाठवावेत.असे आवाहन पंढरपुर तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांनी केले आहे.या बाबत अधिक माहितीसाठी श्री.भुसे सर 9579101433, श्री.आर्वे सर 8788293265,श्री.पवार सर 9503808098 यांच्याशी संपर्क करावा व फाकडे झेरॉक्स सेंटर, के.बी.पी कॉलेज समोर,पंढरपुर.सायली जनरल स्टोअर्स,विवेक वर्धिनी शाळेजवळ,पंढरपुर येथे जमा करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
