शेळवे (ता.पंढरपूर) येथील ग्रामीण लेखक अंकुश गाजरे यांच्या “सारीपाट” कथासंग्रहाला राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत जयंती व पुण्यतिथी निमित्त “स्वदेशी भारत साहित्य सन्मान पुरस्कार” नुकताच आसू, (ता.फलटण) येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.. याप्रसंगी व्यासपीठावर ह.भ.प.पुरूषाेत्तम महाराज हिंगणकर, कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे,.प्रमाेद झांबरे, आयोजक कवी प्रकाश सकुंडे आदी मान्यवर उपस्थित हाेते. याच मान्यवरांच्या हस्ते लेखक अंकुश गाजरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र, ग्रंथ आणि वृक्षाचे रोप असे पुरस्काराचे स्वरूप होते.
लेखक अंकुश गाजरे यांच्या “अनवाणी” आत्मकथानसह ५ पुस्तके प्रकाशीत आहेत.. तर सारीपाट हा कथासंग्रह नुकताच समाजसेविका माई सिंधुताई सपकाळ यांच्याहस्ते प्रकाशित झाला आहे… गाजरे यांच्या “अनवाणी” आत्मकथानाचा कोकणी भाषेत अनुवाद झाला आहे.. तर यापूर्वी लेखक गाजरे यांना त्यांच्या लेखनाबद्दल गोवा, गुजरातसह महाराष्ट्रातून २० हुन अधिक साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. स्वदेशी भारत साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातून लेखक अंकुश गाजरे यांचे अभिनंदन होत आहे.