Uncategorized

आ.रणजितसिह मोहिते पाटील यांच्या निधीतून भाळवणी आणि करकंब आरोग्य केंद्रास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध होणार

विधानपरिषदेचे आमदार रणजितसिह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून सोलापूर जिल्ह्यातील ६ प्राथमिक आरोग्यकेंद्रांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना पत्र दिले असून आपल्या आमदार निधीतून यासाठी २४ लाख रुपये खर्च करण्यात यावेत अशी सूचना केली आहे.या मध्ये पंढरपूर तालुक्यातील भाळवणी आणि करकंब प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे.या […]

Uncategorized

करकंबमध्ये ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन, करकंब तालुका पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, रजनी देशमुख, सरपंच तेजमाला पांढरे, माजी सरपंच आदिनाथ देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, […]

Uncategorized

उजनीच्या ५ टिएमसी पाण्यावर इंदापूरचा डल्ला  

जलसंपदा विभागाच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा   इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेती सिंचन व निरा डावा कालव्यावरील 22 गावांच्या शेतीसाठी उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाने २२ एप्रिल २०२१ रोजी आदेश जारी केले आहेत.या आदेशाची प्रत या फेसबुक पोस्टवर टाकत अत्यंत आनंदाचा व ऐतिहासिक क्षण आहे. या निर्णयाने दोन्ही कालव्यांवरील हजारो हेक्टर जमीन […]

Uncategorized

मंगळवेढा तालुक्यात कोविड सेंटर चालू करा अन्यथा आंदोलन

मंगळवेढा तालुक्यात कोळी सेंटर मिळणे बाबत सर्व देशात व राज्यात करोना या रोगाने धमाकुळ घातला आहे तरी मौजे मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापूर या ठिकाणी कोरोणावर मात करण्यासाठी मंगळवेढा या ठिकाणी कोविड सेंटर उभा रहावे तसेच राजकीय उमेदवार व पुढाऱ्यांनी या कोविड सेंटरसाठी मागणी करून मंगळवेढा येथे कोविड सेंटर लवकरात लवकर उभारावे ही विनंती कारण […]

Uncategorized

”पांडुरंग” ची ऑक्सिजन प्लान्ट उभारणीसाठी युद्धपातळीवर तयारी सुरु -आ.प्रशांत परिचारक

पंढरपूर शहरातील विविध डॉक्टरांची बैठक घेऊन आ.परिचारक यांनी घेतला आढावा  राज्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सध्या ज्या गतीने वाढत चालली आहे ती गतवर्षीपेक्षा भयानक परिस्थिती निर्माण करण्याच्या दिशेने असून राज्यात अधिक त्रीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेडची नितांत गरज भासत आहे.केंद्र आणि राज्याकडून ओद्योगीक क्षेत्राला होणारा ऑक्सिजन पुरवठा जवळपास पूर्णपणे थांबविण्यात आला असला आणि […]

Uncategorized

अखेर मंदिर समितीचा दिलासादायक निर्णय

राज्यात गतवर्षी कोरोनाचा शिरकाव झाला आणि सुमारे साडेचार महीने लॉकडाऊनचा अंमल राज्याबरोबरच पंढरपूर शहर व तालुक्यात राहिला.त्यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने सर्वसामान्य नागरिक,आश्रित,निराधार यांना अन्न वाटप तर जनावरांना चारा वाटप केले,उपजिल्हा रुग्णालयास हायस्पीड ऑक्सिजन मशीन ची उपलब्धता करून दिली.पुढे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर हे काम थांबले.मात्र या वर्षी एकच महिन्यात कोरोनाने जसा राज्यात […]

Uncategorized

११ वर्षाच्या परिचारक विरुद्ध भालके राजकीय लढतीचा उद्या अंतिम सामना 

पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षात पक्ष हि गौण बाब ठरली असून परिचारक विरुद्ध आण्णा गट आणि परिचारक विरुद्ध विठ्ठल परिवार असाच राजकीय संघर्ष तालुक्यात पहावयास मिळाला.१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत स्व.औदूंबरअण्णा पाटील हे खटारा हे चिन्ह घेऊन नांगरधारी शेतकरी चिन्ह घेऊन समोर ठाकलेल्या जनसंघाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या विरोधात लढले आणि विजयी झाले.तेव्हा पासून परिचारक […]

Uncategorized

“विठ्ठल साखर कारखाना विकला तरी कर्ज पिटनार नाही”

“विठ्ठल साखर कारखाना विकला तरी कर्ज फिटणार नाही” सौ.शैलाताई गोडसे. पंढरपूर(प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उभा असलेला विठ्ठल साखर कारखाना पूर्वी राज्यात सर्वात जास्त दर.देणारा कारखाना म्हणून ओळखला जात होता. परंतु आज या कारखान्याला शेतकऱ्यांचे ऊसबील देता येत नाही.. की कामगारांचे पगार देता येत नाही. प्रचंड कर्जात अडकलेला हा कारखाना हा विठ्ठल कारखाना विकला तरी या कारखान्याचे कर्ज […]

Uncategorized

शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या दोन्ही दादांना पराभूत करा”…सौ.शैलाताई गोडसे

“शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या दोन्ही दादांना पराभूत करा”…सौ.शैलाताई गोडसे. पंढरपूर(प्रतिनिधी)पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीत प्रचारासाठी केंद्रीय मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री व अन्य नेते या मतदारसंघात येऊन जनतेचे,शेतकऱ्यांचे कल्याण करु म्हणू लागले आहेत. इतक्या दिवस झोपी गेलेले हे नेते आता या मतदारसंघात येऊन जनतेचे प्रश्न सोडवू.म्हणत आहेत. ज्या दोन्ही उमेदवार चेअरमनने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यांची ऊसबील थकीत ठेवतात. […]

Uncategorized

लॉकडाऊनच्या काळात रिक्षा चालकांच्या कुटूंबाचे हाल मी जवळून पाहिलेत-शैला गोडसे

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्यात मृत्यूचे तांडव सुरु असतानाच लॉकडाऊन,आर्थिक मंदी यामुळे राज्यातील छोटेमोठे व्यवसायिक विशेषतः रोजच्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे मोठे हाल झाले.यात रिक्षा चालकांच्या कुटूंबाचे हाल तर अगदी जवळून पाहिले आहेत,व्यवसाय ठप्प असल्याने कर्जाचे हप्ते कसे भरायचे या विवंचनेत हे रिक्षा चालक हतबल झाले होते.खाजगी सावकारांकडून भरमसाठ व्याजाने रकमा घेऊन आपल्या गरजा रिक्षा चालकांनी भागवल्या,महायुतीच्या […]