Uncategorized

लॉकडाऊनच्या काळात रिक्षा चालकांच्या कुटूंबाचे हाल मी जवळून पाहिलेत-शैला गोडसे

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्यात मृत्यूचे तांडव सुरु असतानाच लॉकडाऊन,आर्थिक मंदी यामुळे राज्यातील छोटेमोठे व्यवसायिक विशेषतः रोजच्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे मोठे हाल झाले.यात रिक्षा चालकांच्या कुटूंबाचे हाल तर अगदी जवळून पाहिले आहेत,व्यवसाय ठप्प असल्याने कर्जाचे हप्ते कसे भरायचे या विवंचनेत हे रिक्षा चालक हतबल झाले होते.खाजगी सावकारांकडून भरमसाठ व्याजाने रकमा घेऊन आपल्या गरजा रिक्षा चालकांनी भागवल्या,महायुतीच्या सत्ताकाळात रिक्षा चालक कल्याणाकरी मंडळाची घोषणा होणेच बाकी होते पण पुढे तो विषय बासनात गेला.हातावरले पोट असणाऱ्या रिक्षा चालकांसाठी तातडीने कल्याणकारी मंडळ स्थापन करावे यासाठी शासनदरबारी ठोस पाठपुरावा करण्यासाठी रिक्षा चालक आणि त्यांच्या कुटूंबियांनी मला मतदान करून विधानसभेत पाठवावे अशी ग्वाही  अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी दिली आहे.   

         २५२ पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत शैला गोडसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून सध्या त्या मतदार संघातील विविध घटकांशी संवाद साधत मतदारांसमोर आपली भूमिका मांडत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून शैला गोडसे या दोन्ही तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत,प्रसंगी उग्र आंदोलने,मोर्चे काढत त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे.मतदार संघातील अनेक दुर्लक्षित प्रश्नांचा त्यांचा अभ्यास असून रिक्षा चालक आणि त्यांचे कुटूंबीय यांच्यासाठी शैला गोडसे यांनी बोलून दाखविलेली तळमळ पाहता त्या रिक्षा चालक कल्याणकारी मंडळासाठी नक्कीच ठोस भूमिका घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *