Uncategorized

आ.रणजितसिह मोहिते पाटील यांच्या निधीतून भाळवणी आणि करकंब आरोग्य केंद्रास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध होणार

विधानपरिषदेचे आमदार रणजितसिह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून सोलापूर जिल्ह्यातील ६ प्राथमिक आरोग्यकेंद्रांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना पत्र दिले असून आपल्या आमदार निधीतून यासाठी २४ लाख रुपये खर्च करण्यात यावेत अशी सूचना केली आहे.या मध्ये पंढरपूर तालुक्यातील भाळवणी आणि करकंब प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे.या दोन्ही ठिकाणी मिळून ८ लाख रुपये किमतीचे १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध होणार आहेत.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्समध्ये प्रेशर स्विंग ऍबसॉरबशन तंत्र वापरले जाते.त्यामाध्यमातून आजूबाजूची हवा खेचून त्यातून नायट्रोजन वेगळा करून शुद्ध ऑक्सिजन तयार होते व त्याचा थेट रुग्णाला पुरवठा करता येतो.ऑक्सिजनची कमी मागणी असलेल्या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असून ऑक्सिजन रिफील करण्याची गरज नसल्याने हे मशीन अतिशय उपयोगाचे सिद्ध झाले आहे.

       आमदार रणजितसिह मोहिते -पाटील यांच्या आमदार निधीतून सोलापूर जिल्ह्यातील जेऊर,टेम्भूर्णी,मोडनिंब,करकंब,भाळवणी मेडशिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना २४ लाख रुपये किमतीचे ३० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.                      

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *