Uncategorized

अखेर मंदिर समितीचा दिलासादायक निर्णय

राज्यात गतवर्षी कोरोनाचा शिरकाव झाला आणि सुमारे साडेचार महीने लॉकडाऊनचा अंमल राज्याबरोबरच पंढरपूर शहर व तालुक्यात राहिला.त्यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने सर्वसामान्य नागरिक,आश्रित,निराधार यांना अन्न वाटप तर जनावरांना चारा वाटप केले,उपजिल्हा रुग्णालयास हायस्पीड ऑक्सिजन मशीन ची उपलब्धता करून दिली.पुढे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर हे काम थांबले.मात्र या वर्षी एकच महिन्यात कोरोनाने जसा राज्यात हाहाकार माजवला आहे तशीच परिस्थिती पंढरपूर तालुक्यात निर्माण झाली आहे.या कठीण वेळी मंदिर समितीने तातडीने कोविड केअर सेंटर सुरु करावे अशी मागणी शहरातील नागिरकांकडून होत होती आणि पंढरी वार्ताने त्यासाठी पाठपुरावा केला होता.आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अतिशय दिलासादायक निर्णय घेतला असून समितीच्या वेदांता व व्हिडिओकॉन या दोन्ही भक्त निवासात उपलब्ध असलेल्या खोल्यात कोविड केअर सेंटर सुरु करण्यास मान्यता देत तशा आशयाचे पत्र प्रांताधिकारी पंढरपूर यांना देण्यात आले आहे.                
भोसे येथील डॉक्टर अपर्णा तळेकर यांनी कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी कोरोना केअर सेंटर व प्रायमरी कोरोना हेल्थकेअर सेंटर सुरु करण्यासाठी नाममात्र दराने भक्त निवास उपलब्ध करून द्यावे अशी मागणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे दिनांक २० एप्रिल रोजी केली होती.त्या नुसार २१ एप्रिल रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये हि धर्मदाय संस्था असल्याने कोविड रुग्णांसाठी वेदांता व व्हीडिओकॉन भक्त निवास येथील खोल्या व त्यामधील २०० बेड निशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला.कोरोना केअर सेंटर व प्रायमरी कोरोना हेल्थकेअर सेंटर सुरु करण्यासाठी डॉ.अपर्णा तळेकर यांच्याशी प्रांताधिकारी पातळीवर निर्णय घेतला जावा असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.           

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *