कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी २१ मे पासून पुढील दहा दिवस विशेष आदेश काढत दूध विक्री,किराणा मालाची दुकाने याना केवळ घरपोहोच विक्रीची परवानगी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दिली आहे.या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपुर शहर पोलिसांकडून शहरात सर्वत्र कारवाईसाठी पेट्रोलिंग केले जात आहे. आज दि.22/05/2021रोजी 08/45वा चे सुमारास डोंबे गल्ली,वाघोली बिल्डींग शेजारी श्री कृष्ण दुग्धालय […]
Uncategorized
पोटगी बंद आंदोलन करीत पुण्यात आंदोलकांकडून हिंदू विवाह कायद्याची होळी
हिंदू विवाह कायदा आधीच मिस यूज म्हणून वारला जात आहे. महिला या नियमाचा 90 टक्के मीस यूज करत आहेत आणि पुरुष 10 टक्के देखील करत आहेत. परंतु केवळ हिंदू विवाह कायद्यामुळे पुरुषांना न्याय मिळण्याची तरतूद नाही आणि केवळ स्त्रियांसाठी बनविला गेला, पुरुष साठी या कायद्यात काहिच नाहीं या अन्यायामुळे पुरुष आत्महत्या करीत आहेत, तरीही यंत्रणा […]
कोरोना अपडेट :पंढरपूर शहरात नव्याने बाधितांच्या संख्येत घट मात्र तालुक्यातील बाधितांची वाढ चिंताजनकच
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात ३० तर तालुक्याच्या ग्रामीण भागात १९९ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.गेल्या तीन दिवसात शहर व तालुक्यातील उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मात्र मोठी घट झाली आहे.आज २३ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार सद्या २२९४ कोरोना बाधित उपचार घेत आहेत. तर […]
उपमुख्यमंत्री अजितदादांचे आमंत्रण,अभिजित पाटील यांनी मंत्रालयात जाऊन घेतली भेट
कोरोना बाधितांवरील उपचारासाठी राज्यातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यानी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घाव्या असे आवाहन केले होते.त्या आवाहनास तात्काळ प्रतिसाद देत धाराशिव सहकारी साखर कारखाना चोराखळी उस्मानाबाद चे चेअरमन अभिजित पाटील यांनी ऑक्सिजन प्रकल्पाच्या पायलट प्रोजेक्टची अगदी काही दिवसात उभारणी केली.साखर कारखान्याच्या माध्यमातून उभारलेल्या […]
पंढरपूर शहरात 97 तर तालुक्यात 350 कोरोना बाधितांची वाढ
सोलापूर शहरात कोरोना बाधितांची संख्या घटत चालली असतानाच सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागत मात्र नव्याने पुढे येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.सोलापूर जिल्ह्यात पंढरपुर,माळशिरस आणी बार्शी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण उपचार घेत असल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे.तर पंढरपुर तालुक्यात मृत्यूचा आकडाही चिंतेत टाकणारा आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार […]
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची यशस्वी शिष्टाई
शिवसेनेचे उपनेते जिल्हा संपर्क प्रमुख आ.तानाजी सावंत यांनी नुकतेच पंढरपुर येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून या भागातील उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न कारण्याबरोबरच विविध हॉस्पिटलकडून रुग्णांना शासनाने कोरोना उपचारासाठी निर्धारित केलेल्या दराने उपचार करण्यासाठी आग्रही राहण्याचा सूचना केल्या होत्या.त्यांच्या आदेशानुसार कोरोना रुग्णसेवा व मदत कार्यासाठी समितीही […]
लॉकडाऊनमुळे पंढरपुरातील रस्ते निर्मनुष्य,मोटारसायकल चोरांचा कारनामा सुरू
पंढरपुर शहर तालुक्यात १५ एप्रिल पासून लॉकडाऊनची कडक अमलबजावणी सूर असतानाच अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी दिलेली सकाळी ७ ते १ ची वेळ वगळता इतर वेळी संपूर्ण शहरातील रस्ते जवळपास निर्मनुष्य असल्याचे दिसून येत आहे.याचीच संधी साधत मोटारसायकल चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येत असून गेल्या काही दिवसात शहरातून ४ मोटार सायकल चोरीस गेल्याची फिर्याद पंढरपुर शहर पोलीस […]
पंढरपूर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचे तातडीने लसीकरण करा !
दिनांक १५ मे रोजी पंढरपूर येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणा बाबतच्या अडचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन शासकीय विश्राम गृह पंढरपुर येथे करण्यात आले होते.या बैठकीत शिवसेनेचे जिल्हा समानव्यक प्रा.शिवाजी सावंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.यावेळी एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष विनय वनारे यांनी प्रा. सावंत यांच्या निदर्शनास अनेक महत्वपूर्ण बाबी आणून दिल्या.पंढरपूर आगारात […]
शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम घेणाऱ्या खाजगी लॅबवर कारवाई करा
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने कोरोना चाचणीचे दर कमी केले आहे. आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचणीसाठी अनुक्रमे 500 आणि 150 असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र शहरातील काही खाजगी प्रयोगशाळा, कोरोना सेंटर व रुग्णालयांमध्ये रॅपिड अँटिजिन टेस्टसाठी नागरिकांना 150 ते 500 रुपये तसेच आरटीपीसीआर चाचणीसाठी 600 ते एक हजार रुपये […]
कोरोना रुग्णसेवा व मदत कार्यासाठी शिवसेनेची समिती स्थापन
शिवसेनेचे उपनेते,सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी पंढरपुर विभागातील पंढरपूर,सांगोला,माळशिरस,माढा,करमाळा तालुक्यातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी पंढरपूर येथे बैठक घेतली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या भागातील कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी एक समिती स्थापन करण्याची सूचना आ.तानाजी सावंत यांनी केली होती. आज सदर समितीची घोषणा करण्यात […]











