Uncategorized

उपमुख्यमंत्री अजितदादांचे आमंत्रण,अभिजित पाटील यांनी मंत्रालयात जाऊन घेतली भेट

कोरोना बाधितांवरील उपचारासाठी राज्यातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यानी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घाव्या असे आवाहन केले होते.त्या आवाहनास तात्काळ प्रतिसाद देत धाराशिव सहकारी साखर कारखाना चोराखळी उस्मानाबाद चे चेअरमन अभिजित पाटील यांनी ऑक्सिजन प्रकल्पाच्या पायलट प्रोजेक्टची अगदी काही दिवसात उभारणी केली.साखर कारखान्याच्या माध्यमातून उभारलेल्या देशातील पहिल्याच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे उदघाटन झाले.या उदघाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री अजित पवार हेही व्हीसी द्वारे सहभागी झाले होते.त्यावेळी अजितदादांनी अभिजित पाटील यांना मुंबईत आल्यानंतर भेटीचे आमंत्रण दिले होते.आज तो योग्य जुळून आला आणि मंत्रालयातील दालनात अजित पवार यांची भेट घेत अभिजित पाटील यांनी अजित पवार यांना श्री विठ्ठलाची प्रतिमा भेट दिली.   

 या भेटीत ना.अजित पवार यांनी अल्पवधीत धाराशिव साखर कारखान्याने उभारलेल्या प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली.तसेच डीव्हीपी समूहाच्या वतीने पंढपुरात सुरु करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलची माहितीही यावेळी त्यांना देण्यात आली.ऑक्सिजन टंचाईच्या संकटकाळात चेअरमन अभिजित पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत जबाबदारी पार पाडली याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिजित पाटील यांची प्रशंसा केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *