Uncategorized

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी २१ मे पासून पुढील दहा दिवस विशेष आदेश काढत दूध विक्री,किराणा मालाची दुकाने याना केवळ घरपोहोच विक्रीची परवानगी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दिली आहे.या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपुर शहर पोलिसांकडून शहरात सर्वत्र कारवाईसाठी पेट्रोलिंग केले जात आहे.
      आज दि.22/05/2021रोजी 08/45वा चे सुमारास डोंबे गल्ली,वाघोली बिल्डींग शेजारी श्री कृष्ण दुग्धालय येथे हे पोलीस कर्मचारी आले असता त्यांना या ठिकाणी सदर आस्थापनाचे मालक दत्तात्रय ज्ञानेश्वर ताड वय-45व्यवसाय-दुध डेअरी,रा.एकलासपुर,ता.पंढरपुर हे जागेवरच डेअरी उघडी ठेवून दूध विक्री करताना आढळून आले असता मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधीकारी सोलापूर यांचा आदेश जा.क्र.2021/डीसीबी/02/आरआर/2294.दि.18/05/2021अन्वये आदेशाचे उलंघन केल्याने पोलीस नाईक धनाजी किसन कर्णेकर यांनी त्याचे विरूध्द भादवि क.188,269प्रमाणे पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *