Uncategorized

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची यशस्वी शिष्टाई  

शिवसेनेचे उपनेते जिल्हा संपर्क प्रमुख आ.तानाजी सावंत यांनी नुकतेच पंढरपुर येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून या भागातील उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न कारण्याबरोबरच विविध हॉस्पिटलकडून रुग्णांना शासनाने कोरोना उपचारासाठी निर्धारित केलेल्या दराने उपचार करण्यासाठी आग्रही राहण्याचा सूचना केल्या होत्या.त्यांच्या आदेशानुसार कोरोना रुग्णसेवा व मदत कार्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली होती.त्यामुळे पंढरपुर विभागातील कोरोना बाधितांच्या कुटूंबाना मोठा दिलासा मिळाला होता व अनेक रुग्णांचे नातेवाईक या संमतीशी संपर्क करीत असल्याचे दिसून येते.   

   पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील एका ६० वर्षीय वृद्धेवर पंढरपुरातील एका प्रख्यात कोविड हॉस्पिटलमध्ये १ मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.यावेळी शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे व तालुका प्रमुख महावीर देशमुख यांनी या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देण्यासाठीही मोलाचे सहकार्य केले होते.सदर महिला १३ मे रोजी कोरोनमुक्त झाल्यानंतर हॉस्पिटलकडून १५५ हजार रुपये बिल आकारण्यात आले.सदर कोरोना बाधित महिलेच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने नातेवाईकांनी हि बाब संभाजीराजे शिंदे व महावीर देशमुख यांच्या कानावर घातली.सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी तातडीने शिवसेनेचे जिल्हा समानव्यक प्रा.शिवाजी सावंत व भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली.याची माहिती मिळताच अनिल सावंत यांनी तातडीने पंढपुरात येत शिवसेनेचे पदाधिकारी संभाजीराजे शिंदे,महावीर देशमुख,सुधीर अभंगराव,रवींद्र मुळे,माउली अष्टेकर,पोपट सावंतराव,विनय वनारे,तानाजी मोरे,लंकेश बुराडे आदींना सोबत घेत थेट संबंधित हॉस्पिटल गाठले व हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी चर्चा करत बिल कमी करण्याची मागणी केली.त्यास हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने प्रतिसाद देत बिल कमी केले.१३ दिवस करण्यात आलेले उपचार लक्षात घेता इतर नामांकित हॉस्पिटलच्या तुलनेत हे बिल निम्म्याने कमी करण्यात आल्याचे दिसून आले.त्यामुळे सदर कोरोना मुक्त झालेल्या महिलेच्या कुटूंबास मोठा दिलासा मिळाला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.         

       या बाबत अधिक माहिती देताना शिवसेनेचे पंढरपुर विभाग जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे म्हणाले कि,शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी दिलेल्या आदेशानुसार रुग्णसेवा व मदतकार्य संमतीची उपविभागीय पातळीवर व तालुका स्तरावर नियुक्ती करण्यात आली.त्यामुळे या भागातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला असून कोरोना बाधित रुग्णावरील उपचारासाठी येणाऱ्या अडचणी दूर करणे त्याच बरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून देण्यात समीती मोलाची भूमिका पार पाडत आहे.नागिरकांच्या या बाबत कुठल्याही अडचणी असोत शिवसैनिक त्यांच्या पाठीशी ठाम राहील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *