Uncategorized

पंढरपूर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचे तातडीने लसीकरण करा !

दिनांक १५ मे रोजी पंढरपूर येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणा बाबतच्या अडचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन शासकीय विश्राम गृह पंढरपुर येथे करण्यात आले होते.या बैठकीत शिवसेनेचे जिल्हा समानव्यक प्रा.शिवाजी सावंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.यावेळी एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष विनय वनारे यांनी प्रा. सावंत यांच्या निदर्शनास अनेक महत्वपूर्ण बाबी आणून दिल्या.पंढरपूर आगारात सेवा बजावत असलेल्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने मुंबई येथे सेवा बजावण्यासाठी पाठविण्यात आले.कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेऊ असे आश्वासनही देण्यात आले मात्र आता या बाबत आगार प्रमुख  दखलही घेत नाहीत,शिवसेना प्रणित एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला असता अपमानास्पद वागणूक देतात अशी तक्रार मांडण्यात आली.हा सारा प्रकार समजताच प्रा.सावंत यांनी थेट परिवहन मंत्री अनिल परब यांना फोन लावून सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याशी संपर्क करीत एसटी कामगारांच्या लसीकरणासाठी तातडीने उपायोजना करावी अशी सूचना दिली असल्याची माहिती एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष विनय वनारे यांनी दिली आहे.

                काही  अधिकारी जाणूनबुजून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचे काम करीत या बैठकीस उपस्थित असलेले राज्याचे माजी राज्यमंत्री  उत्तम प्रकाश खंदारे साहेब यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या अधिकाऱ्यांना समोर बोलावून त्यांची झाडाझडती घेतली यानंतर कोणत्याही शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना जर त्रास झाला तर गाठ शिवसेनेशी असेल, शिवसेना स्टाईल मध्ये त्यांना समजून सांगण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी सह संपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील,जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे,माजी जिल्हाप्रमुख अजय  दासरी,ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख जयवंता माने,शिवसेना पंढरपूर शहर उपशहर प्रमुख एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष विनय वनारे, शहर समन्वयक माऊली अष्टेकर,नेहतराव गुरुजी,दिपक इंगोले,संजय गंगणे,गणेश पवार, संजय ताठे,शशिकांत ताठे यांच्यासह शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *