Uncategorized

टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाला शासनाची विशेष बाब म्हणुन मंजूरी

टेंभुर्णी येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी इमारत बांधकाम व पदनिर्मीती करण्यास मान्यता- आ.बबनदादा शिंदे टेंभुर्णी ता. माढा येथे विशेष बाब म्हणुन 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनाकडे सादर केला होता त्यास राज्य शासनाने विशेष बाब म्हणुन मान्यता दिल्याती माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली. अधिक माहिती अशी की, माढा मतदारसंघातील विविध विकास […]

Uncategorized

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी

न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठामध्ये नागेश्वर राव, हेमंत गुप्ता, रवींद्र भट आणि अब्दुल नाझीर या न्यायमूर्तीचा समावेश आहे. न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या त्रिसदस्यीय पीठाने मराठा आरक्षणास स्थगिती देऊन हे प्रकरण पाच सदस्यीय पीठाकडे सोपविले होते. या पीठाने ५ फेब्रुवारीला सुनावणीचे वेळापत्रक ठरविले होते. त्यानुसार ८ ते १० मार्च या तीन दिवसांमध्ये विरोधक […]

Uncategorized

पंचायत समितीमध्ये नक्की पैशाची मागणी कोण करतंय ?

भारतीय घटनात्मक व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची,समस्यांची सोडवणुक करण्यासाठी जशी नागरी भागात नगर पालिका महत्वपूर्ण भूमिका बजावते तशीच महत्वपूर्ण भूमिका हि पंचायत समिती बजावत असते.आणि दुर्दैवाने भ्रष्टाचारांच्या सर्वाधिक तक्रारी या राज्याच्या विचार करता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीतच केल्या जात असते आणि यात पंचायत समिती हि अग्रेसर आहे.केंद्र आणि राज्य सरकाराच्या विविध कल्याणकारी योजना,केंद्र व राज्य […]

Uncategorized

वर्धापन दिनानिमित्त जुनी पेठ कोळी गल्ली मध्ये पाणपोई चे उदघाटन

वर्धापन दिनानिमित्त जुनी पेठ कोळी गल्ली मध्ये पाणपोई चे उदघाटन…   पंढरपूर (प्रतिनिधी) जुनी पेठ कोळी गल्ली पंढरपूर मध्ये पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशन च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त पाणपोई चे उदघाटन करण्यात आले अशी माहिती एक प्रसिद्ध पत्रकाद्वारे पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी दिली.         जुनी पेठ कोळी गल्ली मध्ये काही काळापूर्वी […]

Uncategorized

राधासुता तेव्हा कुठे गेला होता आपला धर्म !

विठ्ठला तुझी चंद्रभागा मी अडवतोय मला माफ कर म्हणत महाराष्ट्राचे अलौकिक नेते स्व.यशवंत राव चव्हाण यांनी उजनी धरणाच्या पायाभरणीची कुदळ मारली आणि साऱ्या सोलापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणारे उजनी धरण उभे राहिले.जायकवाडी धरणानंतर दोन नंबरचे विशालकाय धरण म्हणून उजनी ओळखले जाऊ लागले आणि सोलापूर जिल्ह्यात कृषीक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.आणि सोलापूर जिल्ह्यात नामदेवराव जगताप गटाचे तत्ववादी […]

Uncategorized

कुटूंब घरातील लग्नकार्यात व्यस्त,चोरटयांनी साधली संधी 

पंढरपूर शहराचे सर्वात मोठे उपनगर म्हणून ओळखल्या जात असलेल्या इसबावीत गेल्या काही महिन्यात सातत्याने चोरीच्या घटना घडत असून मोटारसायकची चोरी हि तर नित्याची बाब झाली आहे.इसबावीच्या बसवेश्वर नगर येथे राहणाऱ्या पोरे कुटूंबास असाच चोरीचा मोठा फटका सहन करावा लागला असून घरात मुलीचे लग्नकार्य असल्याने सारे कुटुंब वाखरी येथे लग्नकार्यात व्यस्त असताना चोरटयांनी संधी साधत बसवेश्वर नगर येथील घरात मागील दारातून प्रवेश […]

Uncategorized

कोरोना मुळे व्यवसाय ठप्प तर छोटे व्यवसायिक अडचणीत,सावकारी पाश होतोय घट्ट !

बँकांकडून सहज कर्ज पुरवठा उपलब्ध होत नसल्याने किरकोळ गरजांसाठीही खासगी सावकारांच्या हातापाया पडावे लागते. थेट घरापर्यंत पोहोचणारा गरजू म्हणजे जणू काही सावजच आहे, अशा अविर्भावात काही खासगी सावकार कर्ज पुरवठा करतात. कर्जदाराची जमीन, घर किंवा किमती ऐवज तारण ठेवून मनमानी व्याजाची आकारणी करतात. विशेष म्हणजे सावकारीचा परवाना नसतानाही कायदा धाब्यावर बसवून कर्जदारांची लूट केली जाते, […]

Uncategorized

पंढरपूर तालुक्यातील ‘या’ पाच गावातील सांडपाण्यामुळे चंद्रभागा नदी प्रदूषित 

संतांनी आपल्या अभंगातून ज्या चंद्रभागेचा बहीण म्हणून उल्लेख केला,ज्या चंद्रभागेचे जल भाविक तीर्थ म्हणून पंढरीच्या वारीस आल्यानंतर प्राशन करतात तर संपूर्ण पंढरपूर शहराचा पाणी पुरवठा या नदीवर अवलंबुन आहे त्या चंद्रभागा नदीमध्ये पंढरपूर तालुक्यातील वाखरी,गुरसाळे,शिरढोण,शेगाव दुमाला आणि गोपाळपूर या गावाच्या हद्दीतून सांडपाणी चंद्रभागेत मिसळले जात असल्याने नदीची प्रदूषण पातळी वाढल्याचे जानेवारी २०२१ मध्ये उघडकीस आले हि बाब खरी आहे का असा प्रश्न आमदार प्रशांत […]

Uncategorized

उपसरपंच निवडीच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याचा खून

 सांगलीत कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगावात उपसरपंच निवडीच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील आणि भाजप खासदार संजय पाटील यांच्या बोरगावातील कार्यकर्त्यामध्ये वाद झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बोरगाव याठिकाणी उपसरपंच निवडीवरून झालेल्या हाणामारीत एका ग्रामपंचायत सदस्यची हत्या झाली आहे. पांडुरंग काळे असे मृत सदस्याचे […]

Uncategorized

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी तरतूद मंजूर

राज्यातील २०वर्षांपासून विना वेतन काम करणाऱ्या शिक्षकांना २०टक्के  व पाच पासून फक्त २०टक्के अनुदानावर असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुढील टप्पा अनुदान देण्यासाठी  ४०४ कोटी निधीची आवश्यकता होती सदर खर्च चालू आर्थिक वर्षाच्या अनुदानातून देने शक्य असल्याने त्यासाठी लाक्षणिक  पुरवणी मागणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर झाली असल्याची माहिती मा आ दत्तात्रय सावंत यांनी दिली.सातत्याने तपासण्याहून होऊन ही अनुदान मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता, राज्यातील ४१३१ […]