

पंढरपूर शहराचे सर्वात मोठे उपनगर म्हणून ओळखल्या जात असलेल्या इसबावीत गेल्या काही महिन्यात सातत्याने चोरीच्या घटना घडत असून मोटारसायकची चोरी हि तर नित्याची बाब झाली आहे.इसबावीच्या बसवेश्वर नगर येथे राहणाऱ्या पोरे कुटूंबास असाच चोरीचा मोठा फटका सहन करावा लागला असून घरात मुलीचे लग्नकार्य असल्याने सारे कुटुंब वाखरी येथे लग्नकार्यात व्यस्त असताना चोरटयांनी संधी साधत बसवेश्वर नगर येथील घरात मागील दारातून प्रवेश करीत कपाटातील २ लाख १४ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहेत.
या बाबत गुलाब दिगंबर पोरे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली असून चोरीस गेलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याचे वर्णन खालीलप्रमाणे :1)1,30,000/-रु किंमतीचे एक सोन्याचे इंद्रजित मंगळसुत्र 28.850ग्रँम वजनाचे 2) 21,000/-रु किंमतीची एक सोन्याचे मिना वर्क वाटी 4.70ग्रँम वजनाची 3) 43,000/-रु किंमतीचे एक सोन्याचे टप्स जोडी कानातील वेल 8.470ग्रँम वजनाचे 4) 19,000/-रु किंमतीची एक सोन्याचे टप्स जोडी 3ग्रँम वजनाची 5) 1 500/- रु किंमतीची एक जोडी 2 भार वजनाची चांदीची अशी एकूण अंदाजित किंमत 2,14,500/- हा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भादंवि ३८०,४५४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.