Uncategorized

उपसरपंच निवडीच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याचा खून

 सांगलीत कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगावात उपसरपंच निवडीच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील आणि भाजप खासदार संजय पाटील यांच्या बोरगावातील कार्यकर्त्यामध्ये वाद झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बोरगाव याठिकाणी उपसरपंच निवडीवरून झालेल्या हाणामारीत एका ग्रामपंचायत सदस्यची हत्या झाली आहे. पांडुरंग काळे असे मृत सदस्याचे नाव आहे. तर या मारहाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्यही गंभीर जखमी झाले आहेत. ज्यामध्ये 4 ते 5 जणं जखमी झाले आहेत.

भाजपा गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही हत्या झाल्याचा आरोप जखमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केला आहे. पांडुरंग काळे यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला या उपसरपंच निवडीमध्ये पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आपल्या गटातून चार सदस्य फुटले आणि राष्ट्रवादीचा उपसरपंच होणार या रागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि ज्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग काळे यांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *