Uncategorized

टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाला शासनाची विशेष बाब म्हणुन मंजूरी

टेंभुर्णी येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी इमारत बांधकाम व पदनिर्मीती करण्यास मान्यता- आ.बबनदादा शिंदे

टेंभुर्णी ता. माढा येथे विशेष बाब म्हणुन 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनाकडे सादर केला होता त्यास राज्य शासनाने विशेष बाब म्हणुन मान्यता दिल्याती माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

अधिक माहिती अशी की, माढा मतदारसंघातील विविध विकास कामाचा पाठपुरावा करणेसाठी आ.बबनराव शिंदे हे मागील आठवढ्यात मुंबई येथे होते. यावेळी त्यांनी टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालय मंजूरी, सिना-माढा योजनेसाठी निधीची तरतुद, मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी मिळणे, माढा येथील कोर्ट मंजूरी, नगर पंचायतीसाठी निधी मंजूर करणे यासह अनेक कामांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह संबंधीत विभागाच्या मंत्र्यांच्या भेटी घेऊन विविध प्रकल्पाला मंजूरी व विकास कामांना निधी मिळणेसाठी मागणी केली होती.

टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाबाबत बोलताना आ.शिंदे यांनी सांगितले की, टेंभुर्णी हे गांव सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असून टेंभुर्णी व परिसरातील 40 गावातील नागरिकांची तसेच पंढरपूर,अहमदनगर, शिर्डी,येथे येणारे जाणारे भाविकांची मोठी संख्या आहे. टेंभुर्णी येथे आरोग्य सुविधा कमी असल्याने रुण्ग व त्यांचे नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत होता. परंतू टेंभुर्णी येथे अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी शासनस्तरावर अनेक दिवसांपासून मंजूरी मिळणेसाठी प्रयत्न सुरु होते. मात्र गेल्या वर्षी लॉकडाऊन कोरोना महामारी यामुळे मंजूरी मिळणेस अडचणी निर्माण झाल्या होत्या तरी सातत्याने पाठपुरावा करत होतो. आज 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली असून रुग्णालयासाठी विहीत पध्दतीने जागा अधिग्रहीत करुन तेथे बांधकाम व पदनिर्मीती करणे याबाबत स्वतंत्रपणे शासनाकडून कार्यवाही करण्यात येणार आहे असे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *