भारतीय घटनात्मक व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची,समस्यांची सोडवणुक करण्यासाठी जशी नागरी भागात नगर पालिका महत्वपूर्ण भूमिका बजावते तशीच महत्वपूर्ण भूमिका हि पंचायत समिती बजावत असते.आणि दुर्दैवाने भ्रष्टाचारांच्या सर्वाधिक तक्रारी या राज्याच्या विचार करता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीतच केल्या जात असते आणि यात पंचायत समिती हि अग्रेसर आहे.केंद्र आणि राज्य सरकाराच्या विविध कल्याणकारी योजना,केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजना,आरोग्य विभागाच्या योजना आणि भ्रष्टाचाराचा सर्वात जास्त आरोप होत असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या योजना,विविध वित्त आयोगाच्या योजना यांची अमलबजावणी करण्याचा महत्वपूर्ण दुवा म्हणून पंचायत समिती हि स्थानिक स्वराज्य संस्था ओळखली जाते आणि याच ठिकाणी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या नागिरकांची चिरीमिरी साठी अडवणूक होते हे वेळोवेळी दाखल झालेल्या तक्रारीमुळे निदर्शनास येते.
मंगळवेढा पंचायत समिती मध्ये येणाऱ्या नागिरकांना कामे करण्यासाठी पैशाची मागणी होते हि चर्चा सातत्याने होत आली परंतु आता थेट विधानपरिषदेच्या पटलावरच हे खरे कि खोटे याचा खुलासा होणार आहे.
