Uncategorized

वर्धापन दिनानिमित्त जुनी पेठ कोळी गल्ली मध्ये पाणपोई चे उदघाटन

वर्धापन दिनानिमित्त जुनी पेठ कोळी गल्ली मध्ये पाणपोई चे उदघाटन…

 

पंढरपूर (प्रतिनिधी) जुनी पेठ कोळी गल्ली पंढरपूर मध्ये पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशन च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त पाणपोई चे उदघाटन करण्यात आले अशी माहिती एक प्रसिद्ध पत्रकाद्वारे पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी दिली.

 

      जुनी पेठ कोळी गल्ली मध्ये काही काळापूर्वी इथे भाजीपालेचा बाजार भरत होता. आता नवी पेठ मध्ये स्थलांतर झाले. पण काही व्यापारी आपला इथेच व्यवसाय करत आहेत आणि अनेक खेड्या पाड्याचे लोक इथे येत असतात व इथून नवीन पेठे कडे जाणार हा एकच रस्ता असल्यामुळे लोकांना पाणी पिण्याची इथे कुठेच सोय नाही.

 

   उन्हाळ्याला सुरवात होत असून उन्हाचे प्रमाण जास्तच दिसून येत असल्यामुळे व पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशन द्वितीय वर्धापन दिनाचे अवचित साधून येथे असलेले व्यापारी शंकर परदेशी, संजयकुमार परदेशी, सतीश परदेशी, गणेश भिंगारे, संतोष परदेशी यांच्या हस्ते पाणपोई चे पूजन करण्यात आले.

 

यावेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष निलेश माने, गणेश माने, संपत सर्जे, उमेश जाधव, गणेश साळुंखे, महेश माने, श्रीनिवास उपळकर, राजाभाऊ गावटे, व आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *