ताज्याघडामोडी

धनगर आरक्षणासहित समाजाच्या भेडसावणारे प्रश्न मार्गी लावणार

धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही  धनगर आरक्षणासहित समाजाच्या भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असून आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील. तसेच धनगर वाड्या वस्त्यामध्ये सोई- सुविधा दिल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर […]

ताज्याघडामोडी

“काय होतास तू? काय झालास तू?”; देवेंद्र फडणवीसांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची आजची बैठक चर्चेचा विषय ठरली ते देवेंद्र फडणवीसांमुळे. त्यांनी आजच्या बैठकीत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. भ्रष्टाचार, महिला सुरक्षा, अमरावती हिंसाचार अशा अनेक मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. याबरोबरच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावत खोचक टीका केली आहे. काय होतास तू काय झालास तू […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेच्या मंत्र्याचे twitter अकाऊंट हॅक, परदेशी व्यक्तीचा झळकला फोटो!

शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे ट्वीटर अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. गुलाबराव पाटील यांचे ट्विटरवर हे अधिकृत अकाऊंट आहे. याच अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ते नेहमी ट्विट करत असतात. हे अकाऊंट व्हेरीफाईड देखील आहे. मात्र, गेल्या काही […]

ताज्याघडामोडी

‘शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात, लवकरच सत्ता बदलणार’, भाजप नेत्याच्या वक्यव्याने राजकीय खळबळ

राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजप असा वाद चांगलाच रंगलेला पाहायला मिळतो. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत घरोबा केला असला तरी आता या पक्षांमध्ये फूट पडणार असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आलेला आहे. शिवसेनेचे बारा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याला केल्यामुळे एकच राजकीय खळबळ उडाली […]

ताज्याघडामोडी

शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द, 1 ऑक्टोंबरपासून शिवभोजन थाळी पूर्वीप्रमाणे 10 रूपयाला

राज्यात कोरोनाचे आकडे कमी होत असताना आता राज्यात सुरु असलेल्या ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना 15 एप्रिल पासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून […]

ताज्याघडामोडी

कोणत्याही क्षणी कोसळेल ठाकरे सरकार : नारायण राणे

मुंबई – पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. औरंगाबादेत युतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांनी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हे […]

ताज्याघडामोडी

माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल; चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक वक्तव्य

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुण्यातील गुरुवारी एका कार्यक्रमात उल्लेख माजी मंत्री म्हणून करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी त्यानंतर माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करु नका, असे म्हटले आहे. सर्वांच्याच भुवया चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे उंचावल्या आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सरकार येणार की दुसरा काही मोठा राजकीय भूकंप होणार अशी […]

ताज्याघडामोडी

केंद्र अन् राज्याच्या भांडणात आमचा बळी; शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली खंत

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जात आहे, असा घरचा आहेरच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला दिला आहे. हे मी पूर्वीपासून सातत्याने मीडिया समोर बोलत आलो आहे.मग प्रताप सरनाईक असो की अन्य कोणी? आरोप-प्रत्यारोप होत असतात. विरोधक त्यांचे काम करत असतात, असे सांगतानाच मी किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ यांच्यासह मुलगा आणि जावयाच्या घरांवर ईडीचे छापे

ईडीने बुधवारी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांच्या मुलाच्या आणि जावयाच्या घरावर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. एकूण सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले. मुंबईतील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केली. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार करत सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम आणि गिरणी […]

ताज्याघडामोडी

मद्यधुंद अवस्थेत हायवेवर डान्स, शिवसेना आमदाराने पोलिसाला शिकवला धडा

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथे मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावली. बुलढाण्यातील देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बुलढाण्यातील देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर काहीजण पोलिसांची पाटी लावलेली कार रस्त्यावर उभी करुन रस्त्यातच नाचत होते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी […]