ताज्याघडामोडी

कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलचा क्रीडा दिन उत्साहात संपन्न

दि.६ व ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूल पंढरपूरच्या मैदानावरती क्रिडा दिनाचे उद्घाटन श्री. प्रताप चव्हाण सर क्रिडा शिक्षक व प्राचार्या सौ. मानसी दास मॅडम व प्राचार्य श्री. सिबा नारायण दास सर यांच्या उपस्थितीत पार पडला. यामध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्याना शारिरिक शिक्षणाचे व आरोग्याचे महत्त्व सांगत असताना शारिरिक व मानसिक विकासास प्रोत्साहानपर विद्यार्थ्याना श्री. प्रताप चव्हाण सर व सौ. राणी वाघमोडे मॅडम प्रमुख पाहूणे यांनी मार्गदर्शनपर उपदेश केला यामध्ये पहिल्या दिवशी वेगवेगळे कवायत प्रकार व वेगवेगळ्या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये विध्यार्थ्यानी उत्साहाने सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले तसेच दुसऱ्या दिवशी इयत्ता नर्सरी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अनेक क्रिडा स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊन यश संपादन केले. हा क्रीडादिन पार पाडण्यासाठी सौ. मानसी दास मॅडम व श्री. सिबा नारायण दास सर यांचे मार्गदर्शन लाभले.
चिफ ट्रस्टी श्री. रोहन मालक परिचारक, रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा क्रीडा दिन पार पाडण्यासाठी स्कूलचे क्रीडा शिक्षक श्री. दत्तात्रय शिरसट, श्री. आतिश टाकेकर, तसेच संगीत शिक्षक श्री. उमेश यादव व इतर सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. वैष्णवी भाईक यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *