दिनांक- 15 नोव्हेंबर 2025 रोजी कर्मयोगी किड्स फाऊंडेशन स्कूलमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ वस्तुंचे प्रदर्शन भरविण्यात आले शाळेत भरविण्यात आलेल्या एका अनोख्या प्रदर्शनाने सर्वांचे मन जिंकले आहे. विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करून एक भव्य प्रदर्शन सादर केले. ज्यामध्ये त्यांनी घरातील निरोपयोगी वस्तूपासून सुंदर आणि उपयोगी कलाकृती तयार केल्या या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृकता निर्माण करणे आणि त्यांना सृजनशीलतेचा विकास करण्यांची संधी देणे हा होता.
प्रदर्शनात विविध विषयावर आधारित वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. जसे की- जलसंवर्धन प्लास्टिक पुनर्वापर आणि सामाजिक उपयोगी वस्तू विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बाटली कागद आणि उतर टाकाऊ वस्तूंपासून सुंदर कलाकृती तयार केल्या तसेच विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये विविध चित्रांचे चित्र प्रदर्शन केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री सिबा नारायण दास (कर्मयोगी पब्लिक स्कुल शेळवे) व सौ मानसी दास मॅडम (कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूल पंढरपूर) यांनी केले तसेच रजिस्ट्रार श्री गणेश वाळके व चिपट्रस्टी श्री रोहन मालक परिचारक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे प्रदर्शन पार पाडण्यासाठी शाळेचे कला शिक्षक- कु.वैष्णवी भाईक व कुमार रहीम मुलाणी यांनी मोलाचे परिश्रम घेतले व इतर सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही मोलाचे परिश्रम घेऊन प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडले.






