ताज्याघडामोडी

अखेर मान्सूनने देशातून घेतला निरोप, भारतीय हवामान विभागाची घोषणा

मागील काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात नैऋत्य मोसमी वारे अडकून पडल्यानंतर, अखेर संपूर्ण देशातून मान्सूनने माघार घेतल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. आज 25 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सून परतला असल्याची अधिकृत माहिती हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतके दिवस भारतात सक्रिय राहिला आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये मान्सूनने दिमाखात आगमन केले. त्यानंतर दोन दिवसात मान्सूनचा पाऊस मुंबईत दाखल झाला. मान्सून सुरुवातीला कोसळलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच धांदल उडवली होती. अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. तर सखल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.

यंदाच्या वर्षी मान्सून सामान्य राहणार असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती.
त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. 6 ऑक्टोबरपासून वायव्य भारतातून सुरु झालेल्या पावनसाने राज्यात थैमान घातलं.

विदर्भ, मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. यामुळे अकोला, नाशिक परिसरात पुरजन्य परिस्थिती निमाण झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *