ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्याने परदेशात गाजवले नाव

आंतरराष्ट्रीय खेळाच्या स्पर्धेत मिळवले यश :

पंढरपूर : पंढरपूर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील इयत्ता नववीतील विद्यार्थी अमन अमिर शेख याने तायक्वांदो आणि रायफल शूटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत देशाचे आणि पंढरपूरचे नाव उज्वल केले आहे.
अमन अमिर शेख याने यावर्षीच्या नेपाळ इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये दिनांक ६/१०/२०२५ ते १०/१०/२०२५ रोजी घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाच्या तायक्वांदो स्पर्धेत गोल्ड मेडल आणि रायफल शूटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
अमनने आपल्या कौशल्याने आणि कठोर परिश्रमाने हे यश मिळवले आहे. त्याने या यशाचे श्रेय त्याचे मार्गदर्शक शिक्षक, कोच आणि कुटुंबीयांना दिले आहे.
प्रशालेचे ट्रस्टी माननीय रोहनजी परिचारक सर यांनी अमनचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई मॅडम यांनी अमनच्या लवचिकतेचे, चपळतेचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले. तसेच संस्थेचे रजिस्ट्रार गणेशजी वाळके आणि सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *