गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मागवला मोबाईल अन् पार्सलमध्ये निघाले कांदे, बटाटे, लाडू

फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झालेल्या एका भामट्याने स्वस्तात मोबाईल देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाला फसवले आहे. वन प्लस-९ प्रो या मोबाईलसाठी व्यावसायिकाने भामट्याला १८ हजार रुपये दिले. मात्र त्याने त्यांना मोबाईल पाठवण्या ऐवजी कांदे, बटाटे आणि लाडूचे पार्सल पाठवले आहे. या फसवणूक प्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी या फेसबुक फ्रेंडच्या मुसक्या आवळल्या आहेत. हितेश जैन यांचे मोबाईल […]

ताज्याघडामोडी

मागविला मोबाइल, आला फक्‍त चार्जर;ऍमेझॉन कंपनीवर गुन्हा दाखल

एका व्यक्तीने ऍमेझॉन कंपनीकडून ऑनलाइन माध्यमातून मोबाइल खरेदी केला. मात्र पार्सलमध्ये केवळ चार्जर आणि केबलच ग्राहकाला मिळाली. हा प्रकार हिंजवडी येथे घडला. विपुल विनोद पाटणी (वय 33, रा. फेज 1, हिंजवडी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 28) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऍमेझॉन कंपनी, डिलिव्हरी देणारे कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात भारतीय दंड […]

ताज्याघडामोडी

व्हायरल बातमी खरी की खोटी? चुकीच्या माहिती प्रसाराला आळा बसण्यासाठी Facebook चं मोठं पाऊल

याच पार्श्वभूमीवर, चुकीची माहिती पसरवली जाऊ नये म्हणून आता अखेर सोशल मीडियाकडून काही पावलं उचलली गेली आहेत. चुकीची माहिती असलेली ट्विट्स फ्लॅग करण्याची सुविधा अलीकडेच ट्विटरने दिली होती. आता फेसबुकनेही माहितीची सत्यता दर्शवण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. कोविड-19 आणि त्यावरील लशी, हवामानबदल, निवडणुका आणि अन्य अनेक विषयांबद्दल चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती फेसबुकवर शेअर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सावधान! कोणी तुमच्या नावावर बनावट SIM कार्ड तर वापरत नाही ना? पाहा कसं कराल ब्लॉक

नवी दिल्ली, 23 मे : अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत, ज्यात लोकांनी त्यांच्या आयडीच्या प्रुफच्या आधारे, कोणी बनावट सिमचा वापर करत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. देशात अनेकदा गुन्हेगार बनावट सिम कार्डचा वापर करतात आणि त्या कामासाठी चुकीच्या पद्धतीने सिम मिळवतात. त्यामुळे तुमच्या नावावर कोणी बनावट, खोटं सिम कार्ड तर वापरत नाही ना, हे पाहाणं गरजेचं […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डमी विद्यार्थ्यांनी दिली तलाठी पदासाठी परीक्षा; बनवाबनवी अशी झाली उघड

पुणे: गेल्या वर्षी जुलै महिन्यात महापोर्टलवरून घेण्यात आलेल्या तलाठीपदाच्या परिक्षेमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या जागी डमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अहमदनगर येथील तहसीलदार माधुरी आंधळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार नेमीचंद विठ्ठलसिंग ब्रम्हनात (वय ३९, रा. औरंगाबाद) […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

2 कोटी 69 लाख गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या अध्यक्षाला अटक

पुणे – पिंपळे निलख येथील श्री छत्रपती अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅंकेमध्ये कर्ज आणि ठेवीत 2 कोटी 69 लाख 83 हजार 855 रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणात सांगवी पोलिसांनी अध्यक्षाला अटक केली. त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालायने दिला आहे. विलास एकनाथ नांदगुडे (वय 61, रा. पिंपळे निलख) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नवरदेवांचे स्वप्नभंग करणाऱ्या टोळीला बेड्या

पुणे गुन्हे शाखेने खोटे लग्न करुन कुटुंबांना लुटणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील 9 महिला आणि 2 पुरुषांना अटक केले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीने आतापर्यंत 50 पेक्षा जास्त कुटुंबांना लुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही खोटे लग्न करणारी टोळी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात सक्रिय होती. यातील महिलांनी आतापर्यंत 50 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नाच्या भूलथापा, उच्चशिक्षित तरुणीला १६ लाखांचा गंडा

कल्याण: विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ओळखीनंतर डॉक्टर असल्याचे सांगून लग्नाच्या भूलथापा देऊन उच्चशिक्षित तरुणीला १६ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीने विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. ही तरुणी खडकपाडा येथे राहते. नवी मुंबईतील एका खासगी कंपनीत ती मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे. विवाह नोंदणी केल्यानंतर तरुणीशी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सोशल मीडियावर ओळख, निवृत्त शिक्षिकेची १३ लाखांची फसवणूक

पुणे: फेसबुकवर ओळख झालेल्या व्यक्तीने एका निवृत्त शिक्षिकेची १३ लाख १७ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६१ वर्षीय महिलेने मुंढवा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरोधात फसवणूक व आयटी अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी ते जून २०२० दरम्यान […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अंधश्रद्धेच्या नावाखाली 2 किलो सोनं पुरुन 25 लाख खर्च

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी देवस्थानच्या तत्कालीन विश्वस्थ मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली मोहटादेवी मंदिरात सुमारे 2 किलो सोने पुरून त्यावर मंत्रोपचारासाठी 25 लाख रुपये खर्च केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश […]