ताज्याघडामोडी

राज्यात 28 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढवला

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Virus) नियंत्रणात असला तरी कोविड-१९ (Covid-19) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढ आहेत. तसेच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या राज्य सरकारने बंद असलेल्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचवेळी कोरोनाचा धोका नको म्हणून पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार […]

ताज्याघडामोडी

कोरोना लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर आता कारवाई!

मुंबई : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलंय. दरम्यान देशात निर्मिती होत असलेल्या लसीबाबत अनेक अफवाही ऐकायला मिळत आहेत. त्याबाबत केंद्र सरकारनं आता कठोर पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत एक […]

ताज्याघडामोडी

राज्याच्या आरोग्य विभागाने फेटाळले लसीकरण स्थगितीचे वृत्त

शनिवारपासून देशासह राज्यात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. पण राज्यात दोन दिवसांसाठी लसीकरण अभियान स्थगित करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. १८ जानेवारीपर्यंत लसीकरण लस नोंदणीसाठीचे ‘को-विन’ अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, हे वृत्त राज्याच्या आरोग्य विभागाने फेटाळून लावले आहे. कोरोनावरील दोन प्रतिबंधात्मक लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर शनिवारपासून […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

कोविड लसीकरणासाठी प्रशासन सज्ज-प्रांताधिकारी-सचिन ढोले

पहिल्या टप्प्यातील लसीकरण दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने व आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून, कोविड लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. पहिल्या टप्प्यात 1610 डोज उपलब्ध झाले असून, तालुक्यातील डॉक्टर्स व आरोग्य सेवा देणाऱ्या संबंधित […]

ताज्याघडामोडी

कोरोनाबाधितांना ग्रामपंचायतीसाठी करता येणार मतदान

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता कोरोनाबाधिताला आता मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली आहे. कोविड बाधित मतदारांना मतदान समाप्तीच्या अर्धा तास आधी मतदानाची सुविधा दिली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली.  बाधित आणि विलगीकरण कक्षातल्या व्यक्ती, तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची […]

ताज्याघडामोडी

जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम

सोलापूर, दि.13: सोलापूर जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लस दिली जाईल. लसीकरण मोहिमेसाठी सर्व प्राथमिक तयारी झाली असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड लसीकरणाबाबत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला […]

ताज्याघडामोडी

पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात लस रवाना

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटट ऑफ इंडियामधून कोव्हिड-19 लशीची पहिली खेप रवाना करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सिरम इंन्स्टिट्युटमधून कोरोना विरोधी ‘कोव्हिशिल्ड’ लस देशातील विविध राज्यांसाठी पुणे एअरपोर्टकडे रवाना करण्यात आली. पण, ही लस कोणत्या राज्यांकडे रवाना करण्यात आली याबाबत सीरम इन्स्टिट्यूटकडून माहिती मिळू शकलेली नाही.16 जानेवारीपासून देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. […]

ताज्याघडामोडी

कोरोना प्रतिबंधक लसीची अधिकृत किंमत सीरमने जाहिर केली

लवकरच कोरोना लसीकरणाला देशात सुरुवात होणार असून केंद्र सरकारकडून पुण्याच्या ‘सीरम इंस्टिट्यूट’ला लसीची पहिली ऑर्डर मिळाल्याचीही माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला पहिली ऑर्डर दिल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे. त्याचबरोबर लसीची अधिकृत किंमत देखील समोर आली आहे. २०० रुपये एवढी लसीच्या एका डोसची किंमत असणार असल्याची माहिती सीरम […]

ताज्याघडामोडी

मोठी बातमी : देशात लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात

नवी दिल्ली : देशात लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. दुसर्‍या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त व तिसर्‍या टप्प्यात गंभीर आजाराने ग्रस्त 50 वर्षाखालील लोकांना लसी दिली जाईल. दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात सुमारे 27 कोटी लोकांची लसीकरण होईल.16 जानेवारीपासून देशात प्रत्यक्ष […]

Uncategorized

देशासाठी आनंदाची बातमी

           पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया उत्पादित करत असलेल्या अणि ऑक्‍सफर्ड विद्यापीठ-ऍस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेल्या लसीच्या आपत्कालीन वापराला औषध नियामकांच्या विषय तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मान्यता दिली. त्यामुळे या लसीकरणाच्या देशव्यापी मोहीमेला लवकरच सुरवात होण्याची आशा आहे.            सीरमने दिलेल्या महितीनुसार कोविशिल्डचे पाच कोटी डोसचा साठा सध्या तयार […]