मुसळधार पाऊस, महापूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये कोकणातील चिपळूण, खेड, महाड तालुक्यात कधीही न भरुन येणारं नुकसान झालं आहे. याच नुकसानाची पाहणी करण्यासाठी नेतेमंडळींचे दौरे सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही चिपळूणमधील पूरस्थिती आणि झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
Tag: #BJP
भाजपच्या माजी नगरसेवकाने दिली खुनाची सुपारी,घटनेपूर्वीच सुपारी किलर पोलिसांच्या ताब्यात
पुणे कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे माजी नगरसेवक विवेक महादेव यादव यांनी त्यांचा विरोधक असलेल्या बबलू गवळी याच्या खूनाची सुपारी कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला दिली असल्याची व हे दोन्ही सराईत सुपारी किलर खुनाच्या हेतूने वावरत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे गस्तीवर असताना पोलीस कर्मचारी सुशील धिवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी […]
पक्षात या योग्य सन्मान मिळेल; पंकजा मुंडेंना शिवसेनेची ऑफर
मुंबई – मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त येत आहेत. सुरुवातीला विधान परिषदेसाठी डावलल्या नंतर केंद्रीय मंत्रीमंडळातही पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रितम मुंडे यांना डावलण्यात आले. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता शिवसेनेकडून त्यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच […]
शरद पवार यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन […]
उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार?
मुंबई: राज्याचे विशेष सरकारी वकील अॅ. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अॅ.उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अॅ. उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद […]
महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश
केंद्रीय मंत्रीमंडळाचा आज (बुधवार ७ जुलै २०२१) विस्तार होणार आहे. एएनआयच्या वृत्तानुसार ४३ नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे. शपथविधी आज संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवन येथे होईल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे खासदार नारायण राणे यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. नारायण राणे यांच्यासह भागवत कराड, कपिल पाटील या महाराष्ट्रातील भाजप खासदारांचा केंद्रीय मंत्रीमंडळात […]
राष्ट्रवादी कॉग्रेस,कॉग्रेसकडून शिवसेना कमकुवत केली जात आहे
मुंबई: ईडीचा सिसेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक […]
पायी वारीवरुन गोपिचंद पडळकर आक्रमक; सरकारने विरोध केला तरी वारी होणार
पंढरपूर : एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच दुसरीकडे वारकरी संप्रदायाचा आग्रह असूनही यंदा पायी वारी नाही अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. असे असताना आता मोजक्या वारकऱ्यांसह 3 जुलै रोजी आळंदी येथून पायी वारीला सुरुवात होणार असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणही यात एक दिवस सहभागी होणार असल्याचे वक्तव्य […]
राम मंदिरावरील टीकेवरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
मुंबई – मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवनसमोर जबरदस्त हाणामारी झाली आहे. शिवसेनेकडून राम मंदिरावरुन करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान परिसरातील वाहतूक हाणामारीमुळे विस्कळीत झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी केलेल्या […]
दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित
कोणत्याही परवानगी शिवाय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलिसांचं वर्तन बेकायदेशीर आणि बेशिस्तपणाचं असल्याचा ठपका ठेवत दोन फौजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. याप्रकरणी रावसाहेब दानवे यांनी तक्रार दिली होती. पोलीस अधीक्षकांनी एकाच वेळी 5 पोलिसांना तडकाफडकी निलंबित केल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड […]