ताज्याघडामोडी

पक्षात या योग्य सन्मान मिळेल; पंकजा मुंडेंना शिवसेनेची ऑफर

मुंबई – मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त येत आहेत. सुरुवातीला विधान परिषदेसाठी डावलल्या नंतर केंद्रीय मंत्रीमंडळातही पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रितम मुंडे यांना डावलण्यात आले. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता शिवसेनेकडून त्यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली आहे.

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच आहे. वरिष्ठ नेते त्यांना योग्य सन्मान देतील, असं सूचक विधान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं. ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे. त्या शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांचा योग्य मानसन्मान वरिष्ठांकडून करण्यात येईल, असंही देसाई यांनी नमूद केलं.

पंकजा मुंडे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. तसेच समर्थकांची नाराजी दूर करत आणि पुन्हा लढू असा नारा दिला. पंतप्रधान मोदींनी आपल्याला सन्मानजनक वागणूक दिल्याचे त्यांनी नमूद केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *