गडचिरोली : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. राज्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. सर्व पक्ष या प्रश्नावर बोलत असताना या आरक्षणाच्या आंदोलनात आता नक्षलवादी संघटनेने उडी घेतली आहे. ‘मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा,’ या आशयाची पत्रकबाजी गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून केली जात आहे. ‘आमच्यामध्ये सामील व्हा,’ असे आवाहनही या पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी मराठा तरुणांना केले आहे. […]
Tag: #Maratha
मराठा आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादेची अट शिथिल करण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्नांची गरज -ना.रामदास आठवले
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढता कामा नये ही अट शिथिल करण्यासाठी संविधानात दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे यावर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते खा.शरद पवार […]
मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांचं मोठं विधान
सांगली: मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता खासदार संभाजी छत्रपती यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असं […]
सरकार माझ्यावर पाळत ठेवतय; पण माझी हेरगिरी करून साध्य काय होणार? :संभाजीराजे छत्रपती
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून राज्याचे राजकारण तापलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. आता माझ्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा दावा खुद्द संभाजीराजे यांनी केला आहे. संभाजी राजे यांनी ट्विट करून आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी […]
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमदेवारांना मिळणार 10% EWS आरक्षण
मुंबई | मराठा समाजातील लोकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% EWC आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार 10% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. या संदर्भातील आदेश राज्य सरकरने जारी केला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य […]
संभाजीराजे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजीनामा देण्याची शक्यता
मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर, संध्याकाळी संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषद घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यव्यापी दौरा केला. संभाजीराजेंनी महाराष्ट्राचा […]
शरद पवार आणि खा.संभाजीराजे यांच्यात अवघ्या १० मिनिटाची भेट
मुंबई: मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी त्यामधून काहीही साध्य होणार नाही, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले. एकीकडे संभाजीराजे शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हणतात. मात्र, अवघ्या 10 मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षण, नोकऱ्या, सारथी या सर्व विषयांवर चर्चा कशी काय होऊ शकते, असा सवाल […]
मराठा आरक्षण विरोधी डॉक्टरला केले लक्ष्य; कोल्हापुरात हॉस्पिटलची तोडफोड
कोल्हापूर:मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेणारे डॉ. तन्मय व्होरा यांच्या कोल्हापूर येथील सूर्या हॉस्पिटलची आज ‘ मराठा क्रांती मोर्चा ‘च्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यामुळे तिथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तसेच व्होरा यांनी माफी मागितल्यानंतर तणाव निवळला. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सूर्या हॉस्पिटलवर धडक दिली. तिथे जाब विचारत हॉस्पिटलच्या नामफलकाची […]
तर संभाजी महाराज आडवा येईल, छत्रपती संभाजीराजेंची गर्जना, आमदार-खासदारांनी माघार घेतली तर बघाच
नाशिक: मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने त्यांची भूमिका घ्यावी. मी काही त्यांचा ठेका घेतलेला नाही. भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, यावर तोडगा सांगावा, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. गेल्या सरकारने बोगस कायदा केला का या सरकारने सर्वोच्च न्यायालयात नीटपणे भूमिका मांडली नाही, याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर केवळ ढकलाढकली […]
मोठी बातमी : केंद्र सरकारकडून मराठा आरक्षण संदर्भात फेरविचार याचिका दाखल
नवी दिल्ली : दिल्लीतून महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी पुढे येत आहे. केंद्र सरकारनं मराठा आरक्षण प्रकरणी फेरविचार याचिका दाखल केली आहे. १०२ व्या घटना दुरूस्ती नुसार राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतले नाही. राज्याच्या अधिकाराला बाधा पोहोचवता येणार नाही. अशी भूमिका केंद्र सरकार कोर्टात मांडणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण […]