ताज्याघडामोडी

‘त्या’ शिक्षकास अदा करण्यात आलेले वेतन वसूल करून गुन्हा दाखल करा

‘त्या’ शिक्षकास अदा करण्यात आलेले वेतन वसूल करून गुन्हा दाखल करा

माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
पंढरपूर तालुक्यातील सोनके येथील श्रीनाथ विद्यालयात बी.एम.मुलाणी हे सहशिक्षक या पदावर कार्यरत असताना ते सातत्याने गैरवर्तन करीत असल्याचा आरोप करीत त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते.शाळेतील सहकर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे.पालकांशी उद्धट वर्तन करणे,व्यवस्थापनात हस्तक्षेप करणे आदी कारणांमुळे सहशिक्षक मुलाणी यांना कार्यमुक्त करण्यात आले होते.मात्र कोणताही आदेश नसताना कामावर घेण्यास भाग पाडून स्वतःच्या अधिकारात मुलाणी हे २६ जून २०१७ रोजी शालेय कामी हजर झाले.मुलाणी यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून मी सेवाज्येष्ठ आहे मला मुख्याध्यपक करा,सहीचे अधिकार द्या म्हणून संस्था व्यवस्थापनावर दबाव आणला.सदर मुलाणी हे स्वतः हजर होण्यापूर्वी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून श्रीमती वैशाली चंदनशिवे या काम पहात होत्या.२६ जून पर्यंत श्रीमती चंदनशिवे या काम पहात असल्याची उपस्थिती पत्रकावर नोंद आहे. 
         प्रभारी मुख्याध्यपक श्रीमती चंदनशिवे यांच्या २५ जून २०१७ पर्यंत सह्या असताना सहशिक्षक मुलाणी यांनी मागील पाने फाडून १ ऑक्टोबर २०१५ ते २५ जून २०१७ अखेर हजेरीपत्रकावर दडपण आणून सह्या केल्या आहेत.शिक्षण विभागाच्या कोणत्याही वरिष्ठ कार्यालयाचे आदेश नसताना १ ऑक्टोबर २०१५ ते २५ जून २०१७ या कालावधीतील वेतन ११ लाख ९८ हजार रुपये अनाधिकाराने व वरिष्ठ अधिकाऱ्यांना संगनमत करून काढले आहे.शासनाची फसवणूक केली आहे.
        प्रकरणाची त्वरित चौकशी करून गुन्हा दाखल करावा व शाळेत हजर न राहता वेतन म्हणून अदा करण्यात आलेले ११ लाख ९८ हजार रुपयाची रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांच्याकडे संजय नारायण अभंगराव यांनी केली आहे. 
चौकशी करून कारवाई करू – जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री बाबर
 या बाबतचे संजय अभंगराव यांचे निवेदन प्राप्त झाले असून मी नुकताच या पदाचा चार्ज घेतला आहे प्राप्त निवेदनाबाबत अधिक चौकशी करून आवश्यक वाटल्यास  योग्य ती कारवाई केली जाईल   
सर्व काही नियमानुसार झाले आहे-बी.एम.मुलाणी 
माझ्या वेतनाबाबत जी काही कार्यवाही झाली आहे ती नियमा नुसारच झाली आहे.या बाबत करण्यात आलेली तक्रार मला मान्य नाही अशी प्रतिक्रया या बाबत अधिक विचारणा केली असता श्रीनाथ विद्यालय सोनके येथील शिक्षक बी.एम.मुलाणी यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *